

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
▪️उत्साहपूर्ण मतदानातून विद्यार्थ्यांची निवड
राजुरा(दि.३ सप्टेंबर):-लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात युवा पंचायत निवडणूक २०२५ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांकडून वर्गामध्ये लोकशाही प्रक्रियेबद्दल जागृती व्हावी, नेतृत्वगुणांचा विकास व्हावा यासाठी या निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास सत्तर टक्के विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीला बळकटी दिली.
यावेळी निवडणूक अधिकारी रूपात वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे होत्या. मुख्यमंत्री पदासाठी १२ वी विज्ञान शाखा (बी) चे नयन वैरागडे यांनी २९८ मते मिळवून १२ वी वाणिज्य शाखेच्या वेदांत अलगमकर यांचा २३८ मतांच्या पराभवावर ६० मतांच्या फरकाने विजय मिळवला.
मुख्यमंत्री या पदाकरिता ७२८पैकी एकूण ५१२ विद्यार्थ्यांनी मतदान केले. त्यानुसार नयन वैरागडे महाविद्यालयाचे मुख्यमंत्री म्हणून घोषित झाले. तसेच इतर मंत्रिपदेही घोषित झाली उपमुख्यमंत्री मिलन कोडापे ११ वी कला विभाग,आरोग्य मंत्री तृप्ती साळवे १२ वी विज्ञान विभाग बी,क्रीडामंत्री यश खिरवटकर १२वी वाणिज्य विभाग,सांस्कृतिक मंत्री श्रुतिका येरणे ११ वी वाणिज्य विभाग,महिला सुरक्षा मंत्री (SC/ST) विशेष प्रवर्गातून आवृत्ती मेश्राम 12 वी विज्ञान विभाग अ याशिवाय बीएफडी शाखेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री निकिता फुसाटे बीएफडी तृतीय वर्ष,उपमुख्यमंत्री मदिहा सय्यद बीएफडी तृतीय वर्ष, क्रीडामंत्री प्रणाली खवसे बीएफडी तृतीय वर्ष,सांस्कृतिक मंत्री सानिया भटारकर बीएफडी द्वितीय वर्ष,
आरोग्य व स्वच्छता मंत्री उषा उरकुडे बीएफडी प्रथम वर्ष,
महिला सुरक्षा मंत्री SC/ST विशेष प्रवर्गातून मनीषा गेडाम बीएफडी प्रथम वर्ष यांचा विजय झाला. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन त्यांना जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली.
या निवडणूक प्रक्रियेला यशस्वी करण्याकरिता प्रा.गोविंद झाडे, प्रा.धनंजय डवरे, प्रा. अविनाश रठ्ठे, प्रा.प्रशांत धनवलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मिनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख इतर सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वृंद व कर्मचारी वृंद यांनीही सहकार्य केले.



