

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
▪️साईनगर हनुमान मंदिर कमेटी व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा पुढाकार
राजुरा(दि.4 सप्टेंबर):-राजुरा येथील साईनगर हनुमान मंदिर देवस्थान कमेटी व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राजुरा यांच्या संयुक्त विद्यमानाने साईनगर हनुमान मंदिर देवस्थान येथे आंबा, बदाम, सीताफळ, आवळा, फणस, अशोका प्रजातिचे पंचेवीस वृक्ष लागवड करण्यात आले.
यावेळी साईनगर हनुमान मंदिर देवस्थान कमेटी राजुरा चे संजयराव गडकरी अध्यक्ष, प्रकाश रासेकर उपाध्यक्ष, प्रकाश चौधरी सचिव, शालिकराव उरकुडे सह सचिव, आंनदराव ताजने कोषाध्यक्ष, मनोहर बोबडे सल्लागार, अनंत ताजने सदस्य, विनोद कोंडेकर, एस. यु. सातपुते, लक्ष्मण पोडे, सचिन होरे, अविनाश कुरझेकर, प्रभाकर जुनघरी, राहुल गोवर्धन, तुलसीदास बनपुरकर, माया ताजणे,प्रतिभा सातपुते, संतोष लांडे, केतन जुनघरे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे बादल बेले, रजनी शर्मा, अनंत डोंगे, सर्वांनंद वाघमारे, विठ्ठल बक्षी, नरेंद्र देशकर, रवी बुटले, सुनैना तांबेकर, सुवर्णा बेले, उज्वला जयपूरकर, मनोज तेलीवार, मिलिंद गड्डमवार आदीसह साईनगर वार्डतील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
हनुमान मंदिर परिसरात दरवर्षी तान्हा पोळा, गणेशोत्सव, नवरात्रत्सव, होळी, असे विविध उपक्रम राबाविले जातात. प्रत्येक उत्सावाच्या समित्या वेगवेगळ्या असून सर्वसमावेशक बालगोपाल, युवक युवती, जेष्ठ नागरिक, महिला पुरुष असे मिळून समाजपयोगी कार्य करीत असतात.
यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा तालुका अध्यक्ष अनंत डोंगे, राजुरा तालुका महिला संघटिका अनुराधा डोंगे, सुवर्णा बेले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.



