मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या वतीने गणेश मंडळाना भेटी, अहिर यांनी पाठवण्यात आलेल्या भेट वस्तूचेही केले वाटप

62

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा :- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व मागासवर्ग आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराजजी अहिर हे मागील अनेक वर्षांपासून राजुरा येथील गणेश मंडळाना भेटी देतात व मंडळाना देणगी देतात परंतु ह्यावर्षी काही अपरिहार्य कारणाने त्यांना राजुरा येथे येणे शक्य न झाल्याने त्यांनी राजुरा येथील पदाधिकाऱ्यांना त्यांच्या वतीने गणेश मंडळानां भेटी देऊन त्यांनी पाठवलेली वर्गणी गणेश मंडळाना भेटी देऊन त्यांच्या वतीने वर्गणी सुपूर्द करण्याची विनंती केली.
त्यांच्या सूचनेनुसार राजुरा येथील भाजप पदाधिकारी अरुण मस्की, सतीश धोटे ह्यांच्या नेतृत्वात शहरातील सर्व गणेश मंडळाना भेट देऊन श्री अहिर ह्यांच्यावतीने पाठवण्यात आलेली भेट वस्तू मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली, ह्यावेळी भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष अरुण मस्की, सतीश धोटे, राजू डोहे जनार्दन निकोडे, महादेव तपासे, सचिन शेडे, संदीप पारखी, दिलीप वांढरे, संजय जयपूरकर, राजू गौरशेट्टीवार, पूनम शर्मा, शुभम मस्की, प्रवीण भसाखत्री, सुरेश कल्पल्लीवार हांच्या सह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी ह्यावेळी श्री अहिर उपस्थित राहू ना शकल्याबद्दल खेद व्यक्त करून गणेश मंडळाना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.