महामार्गावरील दिशादर्शक चिन्हे आणि वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येते-अभिजित जिचकार

76

✒️सौ. सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.11सप्टेंबर):-महामार्गामुळे वाहनांची गती वाढली, गतीवर नियंत्रण सुटले की अपघाताची घटना घडत आहे. म्हणूनच मार्गावरील दिशादर्शक चिन्हे आणि वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतो आणि जीवन सुरक्षित ठेवता येते असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभिजित जिचकार यांनी केले.

       राजुरा हैद्राबाद, आदीलाबाद हे नवीन महामार्ग सुरू होत आहे. महामार्गावरील अपघात टाळणे, रस्त्यावरील दिशादर्शक चिन्हे याची माहिती विद्यार्थी व सर्व वाहनधारकांना होण्याचे अनुषंगाने महामार्ग करणाऱ्या ग्रील कंपनीच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथे रस्ता सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला.

    याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभिजित जिचकार उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्राचार्य किशोर उईके होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून ग्रील कँपणीचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण डोंगरे, वरिष्ठ व्यवस्थापक पूनम अर्जापुरे, उपव्यवस्थापक अरविंदकुमार, एम पी पाठक उपस्थित होते.

        विद्यार्थ्याना रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आली त्यानंतर मान्यवरांनी रस्त्यावरील दिशादर्शक चिन्हे, वाहनाचा वेग, वाहतुकीचे नियम, रस्त्यावरील गतिरोधक तथा वळण रस्ता यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निदेशक संतोष कुंदोजवार यांनी केले तर वरिष्ठ व्यवस्थापक पूनम अर्जापुरे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.