“साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी” संघटनेचे निवेदन सादर 

140

▪️उचलले गंभीर व रास्त विषय ; अन्यथा दिला सामुहिक अतिक्रमण करण्याचा इशारा 

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.11सप्टेंबर):-साकोली येथील “साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटना” काही बाहेरून आलेल्या मुजोर अतिक्रमण धारकांवर चांगलीच संतापली असून यातील विविध मागण्यांचे निवेदन नगरपरिषद मुख्याधिकारी यांना ( गुरू. ११ सप्टें.) ला पदाधिकारी व सदस्यगणांनी स्वाक्षऱ्यांसह सादर केले. या कारवाईची तरतूद सात दिवसांत दखल घ्या, अन्यथा संघटनेतर्फे स्थानिक गोरगरीब गरजूंना धरून शहरात विविध जागी सामुहिक अतिक्रमण करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे. 

           गुरूवारी ता. ११ ला प्रशासकीय अधिकारी कल्याणी भवरे यांना हे निवेदन सादर केले. यात नमूद केले आहे की, आम्ही सर्व साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटना आपणास निवेदन सादर करतो की, आमच्या स्थानिक निवासी पुवा सुशिक्षित बेरोजगारांना येथे रोजगार करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. जेथे तेथे बाहेरील लोकांनी अतोनात तीन चार ठिकाणी अतिक्रमणे करून जागेवर कब्जा केला आहे. त्यामुळे गावचे गोरगरीब स्थानिक निवासी आजही उपेक्षित वंचित आहेत. करीता खालील मागण्यांची दखल घेऊन सदर मागण्यांवर त्वरीत कारवाई करण्यात येऊन तसा तातडीने निर्णय घ्यावा.

यातील प्रमुख मागण्या अश्या की, १) साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद हद्दीत जे गाळे अतिक्रमणे करून आहेत. त्यात किती गरजू आपले दूकाने लाऊन स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. त्यांची चौकशी करण्यात यावी. २) साकोली सेंदूरवाफा शहरात किती रूम माफीयांनी खोल्या काढीत गरजूंतर्फे मोठी पगडी घेत त्या खोल्या भाड्याने देऊन केवळ अतिक्रमण करून याचा धंदा व्यवसाय करीत आहेत. त्यांची यादी सादर करण्यात यावी. ३) कुणी कुणी अतिक्रमणे करून आपलीच संपत्ती समजून इतरांना विकण्याचा धंदा केला. त्यांची चौकशी करून अश्यांची यादी सादर करून शासकीय जागेवर खरेदी विक्री प्रकरणी कारवाई करण्यात यावी. ०४) साकोली सेंदूरवाफा शहरात आजपर्यंत कुणी कुणी शासकीय भूखंडावर अतिक्रमणे काढून त्या वहीवाट जागेची विक्री करण्यात आली. किती रूपयांत विक्री केली याची सुद्धा यादी काढून चौकशी करण्यात यावी. व अश्यांवर शासकीय जागेवर गैरव्यवहार प्रकरणी तातडीने दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात यावी. ०५) शहरातील सार्वजनिक सुलभ शौचालय मध्ये लघुशंकेसाठी २ रूपये ही शुल्क रद्द करून विनामुल्य करावे. हे विषय असून सदर वरील मागण्यांवर ०७ (सात) दिवसांत दखल घेण्यात यावी, अन्यथा आमच्या स्थानिक संघटनेतील शेकडो स्थानिक युवा सुशिक्षित बेरोजगार शहरात जेथे जेथे रिकामी जागा दिसणार तेथे तेथे आपले अतिक्रमणे ठोकून त्या सर्व जागेवर आपला कब्जा कायम करण्याचा इशारा देण्यात येत आहे. तरी हे अत्यंत गंभीर विषय लक्षात घेऊन याची तातडीने कारवाई करून योग्य निर्णय घ्यावा. असे स्वाक्षऱ्यांसह निवेदन देण्यात आले. 

           निवेदनात साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मेश्राम, उपाध्यक्ष इंजि. सपन कापगते, अनिल कापगते, पदाधिकारी अनिल मुरकुटे, चंद्रकांत वडीचार, सहसचिव किशोर बावणे, मार्गदर्शक डी. जी. रंगारी, आशिष चेडगे, महेश पोगळे, निलय झोडे, दिगंबर सुर्यवंशी, कृष्णा बडवाईक, शितल नागदेवे, मेघा बडवाईक, रत्ना खंडारे यांसह शहरातील युवा सुशिक्षित बेरोजगार तरूण यावेळी उपस्थित होते.