

चिमुर- यशस्वी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था चिमुर ची वार्षीक साधारण सभा दिनांक 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शहिद बालाजी रायपुरकर सभागृह वडाळा (पैकु) चिमुर येथे संस्थेचे अध्यक्ष आनंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.
या आमसभेत जमा खर्च पत्रक, नफा तोटा पत्रक मंजुर करण्यासोबतच संस्थेच्या हिताकरीता विविध विषयावर चर्चा होणार आहे. सर्व संबंधित सभासदांनी या आमसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष आनंद शंभरकर, उपाध्यक्ष गोविंदा सहारे, व्यवस्थापक क्षम शंभरकर यांनी केले आहे.



