25 सप्टेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी पतसंस्थेची आमसभा

73

 

चिमुर- राष्ट्रसंत तुकडोजी नागरी सहकारी पतसंस्था चिमुर ची वार्षीक साधारण सभा दिनांक 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष गुरुदास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

या आमसभेत जमा खर्च पत्रक, नफा तोटा पत्रक मंजुर करण्यासोबतच संस्थेच्या हिताकरीता विविध विषयावर चर्चा होणार आहे. सर्व संबंधित सभासदांनी या आमसभेला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था अध्यक्ष गुरुदास ठाकरे, व्यवस्थापक गिरीधर मोहीरकर यांनी केले आहे.