27 सप्टेंबर रोजी खंड विकास औद्योगीक बहुउ‌द्दे‌शिय ग्रामिण सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण आमसभा

43

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179

 

चिमुर- खंड विकास औद्योगीक बहुउ‌द्दे‌शिय ग्रामिण सहकारी संस्था मर्या चिमुर र. नं. 367 तालुका चिमुर जिल्हा चंद्रपुर. या बलुतेदार संस्थेची सन 2024-2025 या वर्षाची वार्षिक सर्व साधारण आमसभा दिनांक 27/09/2025 रोज शनिवार ला दुपारी 1.00 वाजता संस्थेच्या कार्यालयात (स्थळ- श्री.देवदत्त गंगाधरजी देवराव नेवलकर यांचे घरी नेहरू चौक, चिमुर) येथे आयोजित केली आहे.

या आमसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे, सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे विवरण पत्र जमाखर्च, नफा, तोटा, ताळेबंद पत्रक वाचुन कायम करणे, सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरीता संस्थेसाठी बाहेरील कर्ज मर्यादा ठरविणे, सन 2025-26 या वर्षाकरीता संस्थेसाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे, सन 2024-25 चे ऑडिट नोटचे वाचन करणे दोष दुरूस्ती अहवाल सादर करणे या विषयावर चर्चा होणार आहे.

या सभेला सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यच गंगाधर देवराव नेवलकर, उपाध्यक्ष मोरेश्वर देवराव पिंपळकर, सदस्य श्री. सुहास भिमराव ठावरी, प्रदिप रघुनाथ लांडे, सौ. सुनिता गंगाधर नेवलकर, सौ. सुचीता मोरेश्वर पिंपळकर, सौ. कुंदाबेन नरेश पटेल, सौ. पुष्पा पांडुरंग शेंडे यांनी केले आहे