शिवाजी महाविद्यालयाच्या इको फ्रेंडली आणि भूगोल विभागाने केले वृक्षारोपण

68

 

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा -हरित महाराष्ट्र समृध्द महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्थानिक शिवाजी महाविद्यालयात इको फ्रेंडली ग्रुप आणि भूगोल विभागाचे विद्यार्थ्यानी महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रजातीचे वृक्षारोपण केले.
याप्रसंगी प्राचार्य संभाजी वरकड, उप प्राचार्य खेराणी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वाढत्या जीवघेणी प्रदूषणात पर्यावरण संरक्षण काळाची गरज असून प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची शपथ घ्यायलाच पाहिजे असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संयोजक तथा प्राध्यापक एस डी तुमावार, एनएसएस पथकाचे प्रमुख जी. डी. बलकी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील भूगोल विभागाचे तसेच इको फ्रेंडली ग्रुप,एनएसएस पथकाचे विद्यार्थी उपस्थित होते.