प्राचार्य समिर पठाण यांचे निधन.

128

 

राजुरा (ता.प्र) :– रामचंद्रराव धोटे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य समिर पठाण वय वर्षे ५१ यांचे दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. अनेक दिवसांपासून ते आजाराशी झुंझ देत होते मात्र त्यांना त्यात यश मिळाले नाही अखेर प्राणज्योत मालवली. त्याच्या पार्थिवावर राजुरा येथील शाही कब्रिस्थान येथे आज दुपारी २ वाजता दफन करण्यात आले. शाही कब्रिस्थान मध्ये मौलाना तसेच नागरिकांकडून मृत्याचा आत्म्याला जन्नत मिळो अशी दुआ करण्यात आली. तसेच त्यांचा परिवाराला अल्लाह धीर दयावे अशी दुआ करण्यात आली. त्यांच्या नंतर त्याची पत्नी, दोन मुले, भाऊ, नातेवाईक, मित्रमंडळी शोकाकुल आहेत.