

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
– राजुरा येथे निघाला आदिवासींचा भव्य मोर्चा.
राजुरा-आदिवासी आरक्षण बचाव हा आमचा संविधानीक व न्यायीक लढा आहे.बंजारा ची आदिवासी आरक्षण मागणी ही गैर कायदेशीर आणि तकलादू आहे. आता ते म्हणतात आम्हाला आदिवासीच्या ताटातील ७% आरक्षणातील हिस्सा नको तर, त्यांच्या सारख्या सवलती देऊन S.T.- B करा. अरे तुम्ही विमुक्त भटक्या जमातीचे ३% आरक्षणाचा लाभ घेत असतांनाही आमचे घर फोडायला निघालात.आदिवासींचे संविधानीक आरक्षण हे गरीबी हटाव चा पोटभरू कार्यक्रम नाही,त्या कडे वाकड्या नजरेने पाहू नका.असा सज्जद दम मोर्चाला संबोधतांना आरक्षण बचाव कृती समितीचे संयोजक तथा आदिवासी नेते बापुराव मडावी यांनी दिला.
आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती व समाज बांधवांच्या वतीने आयोजीत दिनांक २७ सप्टेंबर उलगुलान विराट मोर्चाची सुरुवात कर्नल चौकातील भिवसन देवस्थाना पासून झाली. संविधान चौक-नाका नं.३- गांधी चौक मार्गे जन आक्रोश करीत तहसील कार्यालयावर धडकला.पावसाचे दिवस असतांनाही राजुरा, कोरपना,जिवती,गोंडपिपरी, बल्हारशाह तालुक्यासह जिल्ह्यातील आदिवासी बांधव पारंपरिक वाद्यासह पारंपरिक वेशभूषेत हजारोंच्या संख्येने सामील झाले. तहसीलदारा मार्फत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
आदिवासीच्या पारंपरिक रूढी, परंपरा, संस्कृती व निसर्गप्रेम यांच्याशी बंजाराचा काडीचाही सबंध नसल्याने मुळ आदिवासी बांधवांचा बंजाराच्या मागणीला विरोध आहे.
या मोर्चाला डॉ.मधुकर कोटनाके, भिमराव पाटील मडावी, निलकंठराव कोरांगे,शामराव कोटनाके, गजानन पाटील जुमनाके, अश्विनी कोरांगे यांनी संबंधित केले. समिती अध्यक्ष विजयराव परचाके, परशुराम तोडसाम, नितीन सिडाम, वाघुजी गेडाम, राधाबाई आत्राम,कुंदाताई सलामे,सुभद्रा कोटनाके, अमृत आत्राम, संतोष कुळमेथे,महिपाल मडावी, दशरथ कुडमेथे,आनंद सिडाम, शालीक पेंदोर, रविंद्र आत्राम, सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



