लहान माळीवाडा समस्त माळी समाज मंगलकार्यालयासाठी कालिदास बाविस्कर यांच्याकडून ५१००० /- रुपयाची देणगी समाज भवनासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे : रामकृष्ण महाजन ( अध्यक्ष )

57

 

धरणगाव प्रतिनिधी पी डी पाटील सर

धरणगाव – येथील समस्त माळी समाज पंच मंडळ लहान माळीवाडा यांचा नव्याने उभारण्यात आलेल्या समाज भवनास येथील पंच मंडळाचे सदस्य कालीदास तुकाराम बावीस्कर यांनी आपल्या मातोश्री स्वर्गीय कमलबाई तुकाराम बावीस्कर यांचा स्मृतिप्रीत्यर्थ एक्कावन हजार रुपयाची देणगी रोख स्वरूपात दिली.

त्या अनुषंगाने नुकताच भाद्रपद सप्ताह निमित्त ह.भ.प.जिवराम महाराज कापडणेकर यांचा झालेल्या समारोप किर्तनाचा भरगच्च कार्यक्रमात त्यांना पंच मंडळाचा वतीने गौरव करण्यात आला त्या प्रसंगी अध्यक्ष रामकृष्ण महाजन,उपाध्यक्ष शिवाजी देशमुख,जेष्ठ पत्रकार कडू रुपा महाजन,भटूलाल महाजन, नगरसेवक विलास महाजन, नाना महाराज, राजेंद्र महाजन,दिपक महाजन, धिरज महाजन, सुधाकर महाजन, एस डब्लु पाटील ,गुलाब महाजन शिपाई गणेश निकम सह पंच मंडळाकडून शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

गेल्या दोन वर्षांपासून येथील समस्त माळी समाज पंच मंडळाचे नव्याने उभारण्यात आलेल्या समाज भवनाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले असुन दुसरा मजलाचा स्लॅब देखील टाकण्यात आला आहे दोन मजली वास्तुचे एकुण क्षेत्रफळ 14000/-हजार स्क्वेअर फुट असुन त्यात पहिला मजला 7000/- स्केअर फुट चा आहे त्यात प्रशस्ती सभागृहा,किचन हाॅल,बैठक व्यवस्थे सहीत विविध व्यवस्था करण्यात आली आहे तसेच वरील दुसरा मजला ही सात हजार चौरसफूट आहे त्या जागेवर लग्न समारंभाचा कार्यक्रमासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे आता पर्यंत चौदा हजार स्क्वेअर फुट बांधकामास दोन कोटी पेक्षा अधिक खर्च लागला असून पुर्ण बांधकामास तिन कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे तरी उर्वरित बांधकामा साठी समाजातील दानशुर देणगीदार दात्यांनी पुढे येऊन आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन व पंचमंडळाने केले आहे.