

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगाव – उभ्या महाराष्ट्रात संत व महात्म्यांनी वारकरी संप्रदायाचा माध्यमातून इतिहासातील उभे केलेले कार्य हे सर्व समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन नंदुरबार जिल्ह्य़ातील युवा किर्तनकार ह.भ.प.स्वप्नील महाराज मंदाणेकर यांनी केले.
तसेच समाज जिवनात आई वडील यांची सेवा हाच परमार्थ असल्याचे नमुद करून संत कार्याची मंहती विषद केली आपल्या दोन तासाचा किर्तन प्रबोधनात त्यांनी संत तुकाराम,संत सांवता महाराज,व संत नामदेव महाराज यांचे समाज जिवनातील कार्यात मोठे योगदान असल्याचे नमुद करून संत म्हणतात पंढरपूरला जाऊ नका,आळंदी जाऊ नका,कोणत्याही तिर्थ यात्रा करू नका खरे तिर्थ आपल्याच घरी असुन आपण आई वडील,सासु सासरे ची सेवा करा उतार वयात त्यांना त्रास देऊ नका त्यांना सन्मानाने जिवन जगु द्या एवढेजर आपण करत असाल तरी सर्व तिर्थ केल्याचे पुण्यकर्म आपल्यास लाभेल व जिवनात सुख व समाधान मिळेल असे भावात्मक प्रतिपादन केले.
नुकत्याच येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व दैनिक तरूण भारत चे पत्रकार कडू महाजन यांचा मातोश्री स्वर्गीय अनुसयाबाई रुपा महाजन व लहान बंधु स्वर्गीय पुंडलिक रुपा महाजन यांचा स्मृतिप्रीत्यर्थ किर्तनकाराचा कार्यक्रम संपन्न झाला त्या प्रसंगी ह.भ.प.मंदाणेकर महाराज बोलत होते,आपल्या दोन तासाचा किर्तनातुन त्यांनी सामाजिक प्रोबधन करुन संत व महात्म्याचे विचार सादर केले व वारकरी संप्रदाय हा जगात श्रेष्ठ असल्याचे नमुद संत विचारांची जिवनगाथा सादर केली.प्रारंभी ह.भ.प.स्वप्नील महाराज व टाळकरी भजनी मंडळाचे कुंकू बुक्का लाऊन सर्वाचे जेष्ठ पत्रकार कडू महाजन व परीवाराचा वतीने स्वागत करण्यात आले
कार्यक्रम यशस्वी साठी वासुदेव महाजन,गणेश पाटील,शिवाजी देशमुख, शाम महाजन,राजेंद्र महाजन,ज्ञानेश्वर महाजन सह परीवारातील सदस्य व पंच मंडळाने सहकार्य करून परीश्रम घेतलेप्रसंगी असंख्य समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.



