

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगाव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेनेचे शहर प्रमुख कै.राजेंद्र किसन महाजन व माळी समाजाचे उपाध्यक्ष कै.योगराज गिरीधर महाजन यांच्या स्मरणार्थ “राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे उद्घाटन ” मोठ्या उत्साहात संपन्न झाले. प्रस्ताविक पी डी पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे, शहर प्रमुख विलास महाजन, संजय पवार, राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे तालुका समन्वयक विनायक महाजन, जितेश राजेंद्र महाजन, तेजस राजेंद्र महाजन, यशोदीप महाजन,पवन महाजन, वसीम पटेल, सद्दाम भाई, प्रकाश महाजन उपस्थित होते.
सर्व मान्यवरांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेच्या संदर्भात तालुका समन्वयक विनायक महाजन यांनी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली आणि यासाठी लागणारे कागदपत्र, पासपोर्ट फोटो याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय विद्यार्थी सुरक्षा योजनेचे पत्रक देऊन उद्घाटन करण्यात आले व मुख्याध्यापकांचे हस्ते फॉर्म भरण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी या विमा पॉलिसीचे डोनर जितेश व तेजस राजेंद्र महाजन, यशोदीप योगराज महाजन व विचार मंचावरील मान्यवर यांचे ऋण व्यक्त केले. आपण आमच्या शाळेच्या १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा विमा मोफत करीत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी डी पाटील तर आभार एस एन कोळी यांनी मानले.



