

✒️खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)
खटाव(दि.11सप्टेंबर):-पोलिस प्रशासनाच्याआवाहनाला प्रतिसाद देत गणेशोत्सव अत्यंत सुरळीत पार पडला आहे. आता नवरात्रोत्सवात डीजेमुक्त व पारंपरिक पद्धतीने साजरा तसेच त्या नऊ दिवसांत, मिरवणुकीतही ‘नो डीजे’ अन्यथा कडक कारवाई करू, असा इशारा पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप पोमण यांनी दिला.
पुसेगाव, ता खटाव येथील पोलिस ठाण्यात नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने नवरात्र मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यककर्त्यांची बैठक पोलिस ठाण्याच्या हॉलमध्ये झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे १५ नवरात्रोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पोमण म्हणाले, ‘देवीमूर्ती आगमनावेळी तसेच विसर्जनावेळी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, डीजे वापर करू नये.
नवरात्रोत्सवदरम्यान कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर्स लावले जाणार नाही, याची दक्षता मंडळांनी घ्यावी. कोणीही अफवा पसरवू नयेत किंवा त्यावर विश्वास ठेवू नये, दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक ठरवून दिलेल्या वेळेतच व ठरवून दिलेल्या मार्गाने काढावी, असे आवाहन नवरात्रौत्सव मंडळांना पोमण यांनी यावेळी केले.
पोलिसांकडून कौतुकाची थाप…
पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशोत्सव काळात पुसेगाव हद्दीतील सर्वच गावांमध्ये ‘डीजे’ऐवजी पारंपरिक वाद्याचा वापर करत, वेळेत विसर्जन मिरवणूक काढून नवा आदर्श



