

*सचिन सरतापे( प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड(सातारा ) : पंचरत्न मित्र मंडळ – मुंबई आणि महाराष्ट्र न्यूज 18 पोर्टल चॅनल,NEWS 18 महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने
इंडियन एक्सलेन्स स्टार अवॉर्ड २०२५ साठी माण तालुक्यातील खोकडे ग्रामपंचायत यां ठिकाणी ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असणारे सतीश सखाराम भोसले यांची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारासाठी निवड करणेत आली हा पुरस्कार सोहळा मुबंई येथे आज सम्पन्न होत आहे.
मुंबईतील विक्रोळी नगरीत आदर्श मुंबई फाउंडेशन व पंचरत्न मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने देशसेवेसाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रात निस्वार्थ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणीजनांना मानाच्या” इंडियन एक्सेलन्स स्टार अवॉर्ड 2025 या पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे. अॅड. विजय काशिनाथ कदम सातारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, श्री सतीश सखाराम भोसले, सातारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण, सौ. माया भागवत गुरव आदर्श शिक्षिका, श्री माधव दिगंबर राऊत -सातारा – आदर्श लोकसेवा पुरस्कार इ. मान्यवरांना सन्मानित करणार असल्याचे आयोजक डॉ. संजय भोईर यांनी घोषीत केले आहे.
यां कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री सन्माननीय भरमू अण्णा पाटील हे विशेषतः कोल्हापूर हून येणार आहेत. तसेच कोल्हापुरचे आमदार सन्मा. श्री शिवाजी पाटील, खासदार संजय दिना पाटील (ईशान्य म सुनील राऊत, आमदार सुरेश पाटील चंदगड माजी महापौर किशोरीताई पेडणेकर मुंबई मराठी वृत्तपत्र अध्यक्ष रवींद्र मालुसरे व प्रसिद्ध गायक संतोष चौधरी दादुस, इत्यादी विविध मान्यवरांचे हस्ते गुनिजनांना सन्मानित करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी विकास कॉलेज कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व मुंबई येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे सदर वृत्त कळताच विविध स्तरातून पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



