मुलाचे मेडिकल इन कॅमेरा आईने केली मुलाच्या नार्को टेस्टची मागणी

187

 

प्रतिनिधी(अनिल साळवे, 8698566515)

गंगाखेड तालुक्यातील रामनगर तांडा मौजे महातपुरी या ठिकाणी १० सप्टेंबर रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली या घटनेतील जे कोणी आरोपी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे पण आई वडील व इतर कुटुंबातील व्यक्ती यांचा काय दोष? आरोपी मुलाच्या आईला बेदमपणे मारहाण करतात आई मंगल भोसले या सोनपेठ पोलीस ठाण्यामध्ये गेले असता पोलीसही त्यांचा गुन्हा नोंद करून घेत नाही म्हणून दि.१३ सप्टेंबर रोजी तहसीलदार गंगाखेड यांच्या मार्फत थेट मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऑल इंडिया ब्ल्यू टायगर यांच्या वतीने लेखी निवेदन दिले आहे. मंगल भोसले यांना झालेली मारहाण करणाऱ्या आरोपी यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे व कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आरोपी मुलगा दिपक व पिडीत मुलगी यांची नार्को चाचणी करण्यात यावी व मुलाचे मेडिकल इन कॅमेरा करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
आरोपीची आई मंगल भोसले व त्यांचे पती हे याप्रकरणी पोलीस महासंचालक परिक्षेत्र नांदेड ,पोलीस अधीक्षक परभणी, उपविभागीय पोलीस अधिकारी गंगाखेड यांना प्रत्यक्षात भेटून लेखी तक्रार दिली परंतु पोलीस स्टेशन सोनपेठ यांनी कसल्याच प्रकारे गुन्हा नोंदवला नाही त्यामुळे दिनांक 13 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया ब्ल्यू टायगर या संघटनेच्या वतीने तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना लेखी निवेदन दिले आहे मंगल भोसले यांना मारहाण करणारे आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा पोलीस अधीक्षक परभणी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा यावेळी मंगल भोसले यांनी दिला आहे निवेदनावर बाळू भोसले ,अनिल काळे ,अमोल भोसले, शरद पवार ,सुरेश पवार ,सतीश शिंदे, संगीता भोसले, संतोष पवार ,संभाजी पवार, अजय पवार ,दीपक काळे, उर्मिला भोसले ,आशा भोसले, नमृता पवार नंदिनी पवार यांच्या स्वाक्षरी आहेत.