राकाँशप पक्ष यांनी पडळकरच्या प्रतिमेला मारले जोडे…

66

 

धरणगाव प्रतिनिधी — पी डी पाटील

धरणगाव — येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने वाचाळवीर आमदार गोपीचंद पडळकरच्या प्रतिमेला जोडे मारून तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देऊन निषेध नोंदविण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल एका जाहीर कार्यक्रमात विधानपरिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा जेष्ठ नेते जयंतराव पाटील यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला तसेच त्यांच्या आई – वडिलांच्या बाबतीत देखील गलीच्छ बोलून त्यांचा उपमर्द केला. राजकारण राजकारणाच्या जागी असतं परंतु जयंतराव पाटील सारख्या एका सभ्य आणि सुसंस्कृत व्यक्तिगत टीका करतांना जर या स्तरावर मर्यादा ओलांडली जात असेल तर ते कदापीही खपवून घेतले जाणार नाही, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त करत गोपीचंद पडळकरच्या प्रतिमेला जोडे मारले व घोषणा देऊन निषेध नोंदवला. आमदार गोपीचंद पडळकर याच्यावर असभ्य भाषेचा वापर करणे, एका सभ्य व्यक्तीचा उपमर्द करणे तसेच त्यांच्या आई वडिलांचा जाहीर अपमान करणे या आशयाचे गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष धरणगाव शहर व तालुक्याच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बडगुजर यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. या निवेदनाची तात्काळ दखल घेतली गेली नाही तर पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, जेष्ठ नेते प्रा आर एन भदाणे, राजेंद्र धनगर, नंदू धनगर, हिरामण जाधव, नारायण चौधरी, भगवान शिंदे, उद्योजक एकनाथ पाटील, कॉन्ट्रॅक्टर मोहीत पवार, वीर एकलव्य संघटनेचे बापू मोरे, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, भोण्याचे माजी सरपंच मकरध्वज पवार, प्रवीण वाघ, व्यावसायिक रमेश महाजन, अमित शिंदे, खलील खान, मीडिया प्रमुख रवि महाजन, समाधान महाजन, अफजल कुरेशी, युवक अध्यक्ष परेश गुजर, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, नारायण पाटील, बालाजी महाजन, सागर महाले, नरेंद्र चव्हाण, साजिद कुरेशी, समाधान देवरे, धनराज मालचे, सागर पारधी, विजयसिंग टाक, जुनेद बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.