

*प्रतिनिधी (अनिल साळवे,8698566515)*
त्र्यंबकेश्वर नाशिक येथे वार्तांकणासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा गंगाखेड व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकणासाठी गेलेल्या पत्रकारांवर 20 सप्टेंबर रोजी स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असलेल्या गुंडांनी झी 24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर भीषण हल्ला करत मारहाण केली. या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले आहेत. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र राज्यात पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून ही गंभीर बाब आहे याकडे राज्य शासन व प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याचे आढळून येत आहे. पत्रकारांवर होणारा हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्थंभावर हल्ला असून ही बाब अत्यंत घातक आहे. नेहमीच गुंड प्रवृत्तीचे लोक पत्रकारांवर वारंवार भ्याड हल्ले करून माध्यम स्वातंत्र्याचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत.
अशी शंका पत्रकार बांधवांनी उपस्थित करून पत्रकारांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी राज्य शासन व प्रशासनाने कठोर पावले उचलून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी गंगाखेड व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसीलदार उषाकिरण श्रुंगारे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रति पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर, संजय सुपेकर, अनिल साळवे,अली चाऊस, शिवाजी कांबळे, भागवत जलाले, बालासाहेब कदम, मोसीन खान, अंकुश कांबळे, वसंत गेजगे, शेख महेमूद, प्रेम सावंत, गोपाळ मंत्री, उद्धव चाटे, प्रदिप गौरशेटे, , उत्तम दसवंते, अतुल कलकोटे, गौस हाश्मी आदींसह पत्रकार उपस्थित होते.



