

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
सचिन सरतापे
म्हसवड (सातारा ) : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुका यांच्या वतीने तसेच नालंदा बुद्ध विहार बौद्ध प्रगती मंडळ काळचौंडी यांचे समन्वयाने मौजे काळचौंडी येथे आषाढ पौर्णिमेपासून सुरू झालेला वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.
भारतीय बौद्ध महासभा माण तालुका अध्यक्ष आयु. अरविंद बनसोडे, कोषाध्यक्ष आयु बाळासाहेब सरतापे ,सचिव आयु.श्रीमंत भोसले,ज्येष्ठ बौद्धाचार्य आयु.कुमार सरतापे,आयु.आबासाहेब बनसोडे,माजी तालुकाध्यक्ष आयु.सिद्धार्थ बनसोडे, केंद्रीय शिक्षिका आयुनी.शोभा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने वर्षावास कार्यक्रम मालिका उत्तरोत्तर बौद्ध तत्वज्ञानाच्या अभ्यासाने दिशादर्शक ठरत आहे.
आज वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने नालंदा बुद्धविहार बौद्ध प्रगती मंडळ अध्यक्ष आयु.सूर्यकांत बनसोडे,आयु.जगन्नाथ बनसोडे,आयु. सिद्धेश्वर बनसोडे आणि आयु. अवि भोरे यांनी महाबोधी विहार मुक्ती आंदोलनात काळचौंडी मधून घेतलेल्या उस्फूर्त सहभागाबद्दल भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले.
बौद्ध प्रगती मंडळ काळचौंडी मुंबई अध्यक्ष आयु. अशोक बनसोडे यांनी आपले मत मांडताना सर्वांनी व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून सामाजिक सलोखा वाढवून पुढील काळात एकूणच सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले .व सामाजिक बांधिलकीस मजबूत करण्यासाठी सक्रिय राहू असे मत व्यक्त केले.
आज वर्षावासाचे बारावे पुष्प गुंफताना कालामसूक्त या विषयावर आपले विचार मांडताना आयु सिद्धार्थ बनसोडे म्हणाले की कालाम सुक्त हा मानव मुक्तीचा जाहीरनामाच आहे . कालामसुक्त हे केसपुत्त या गावी कालामांना दिलेल्या उपदेशात भगवंत कालामांना सांगतात की कोणतीही गोष्ट कुशल,अकुशल मंगल,अमंगल सत्य,असत्य यांची पडताळणी करताना, आपण कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास न ठेवता स्वतः विचार करण्याची आणि सत्य पडताळण्याची शिकवण दिली आहे.वारंवार ऐकलेली गोष्ट खरी असू शकत नाही. परंपरेनुसार चालणारी गोष्ट खरी असू शकत नाही. धर्मग्रंथात आहे म्हणून ती स्वीकारणे योग्य नाही. तर्क किंवा युक्तीवादावर आधारित गोष्ट खरी आहे. असे मानू नये. बुद्धीच्या जोरावर किंवा व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाच्या प्रभावाने ती स्वीकारू नये. तर सत्य आणि सत्यता अनुभवाने सर्वसमावेशकता,सर्वांसाठी मंगल असल्याची खात्री झाल्याने स्वतः बुद्धीने तपासूनच स्वीकारणे योग्य आहे.थोडक्यात कालाम सुत्त हा बुद्धांचा स्वातंत्र्य जाहीरनामा मानला जातो. कारण तो लोकांना स्वतंत्रपणे विचार करण्यास आणि कोणत्याही गोष्टीवर अंधश्रद्धा न ठेवता सत्य पडताळण्यास प्रोत्साहित करतो असे प्रतिपादन केले.
तसेच स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या तत्वांवर आधारित समाज घडविताना काळचौंडीतील बौद्ध अनुयायांनी बौद्धतत्त्वानुसार धार्मिक क्रांती करण्यात आपले योगदान द्यावे. तसेच शैक्षणिक क्रांती घडवावी. सामाजिक क्रांती सामाजिक सलोख्यातून दिसून यावी .आर्थिक उन्नतीसाठी क्रियाशील राहावे .नैतिक आचरणाची व्यवहारिक क्रियाकलापांना जोड द्यावी. या सर्वातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली राजकीय क्रांती घडवण्यात आपले सर्वस्व समर्पित करावे.अशा पद्धतीने आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज राहण्याची ग्वाही देण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा माण तालुका तसेच नालंदा बुद्ध विहार बौद्ध प्रगती मंडळ काळचोंडी अध्यक्ष आयु .सूर्यकांत बनसोडे, सल्लागार आयु.जगन्नाथ बनसोडे,खजिनदार आयु.रवींद्र भोरे ,सिद्धेश्वर बनसोडे गौतम बनसोडे ,महेश बनसोडे ,अशोक बनसोडे ,राजाराम बनसोडे ,संतोष बनसोडे ,पांडुरंग भोरे , लालासो भोरे, हर्षल बनसोडे,रोहित बनसोडे, मोहित बनसोडे, रुक्मिणी बनसोडे,उषा बनसोडे, प्रिया भोरे, शिवानी बनसोडे,यशस्वी बनसोडे, कल्पना बनसोडे,ताराबाई बनसोडे यांचे अनमोल सहकार्य लाभले.



