

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
पूर्णा पोलीस स्टेशन येथे जमादार म्हणून कार्यरत असलेले मंचकराव मुंढे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. पोलीस अधीक्षक परभणी यांच्या आदेशाने दिनांक 22 सप्टेंबर रोजी मुंढे यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे.
मंचकराव मुंढे गंगाखेड तालुक्यातील बडवणी आनंद नगर येथील मूळ रहिवासी असून याच ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले पोलीस भरतीमध्ये भरती होऊन आदिवासी नक्षलवादी भाग असलेल्या गडचिरोली येथे बारा वर्षे कर्तव्य बजावले त्यानंतर परभणी येथे 13 वर्षे सेवा दिली सध्या पूर्णा पोलीस स्टेशनमध्ये जमादार म्हणून कार्यरत असताना मुंढे यांचे प्रमोशन होऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती झाली आहे.



