

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
नवरात्र महोत्सवाचे औचित्य साधून गंगाखेड शहरातीलडॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरच्या वतीने भव्य दांडिया नाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा रविवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ वाजेदरम्यान डॉ.लाईन येथील मोरया फंक्शन हॉलमध्ये पार पडणार आहे.स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुक जोडप्यांनी आपली नोंदणी करून प्रवेश फी स्वरूपात शंभर रुपये जमा करावी.नोंदणीसाठी ९८२२७३६००३ किंवा ९८२२७३२००९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्राच्या संचालिका सौ.किरण गारोळे यांनी केले आहे.
या दांडिया नाईट स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षिसांची सोय करण्यात आली आहे.त्यामध्ये सर्वोत्तम पोशाख पुरस्कार सर्वोत्तम जोडी डान्स (पहिले व दुसरे बक्षीस) ग्रुप दांडिया व गरबा स्पर्धा (पहिले व दुसरे बक्षीस) प्रदान करण्यात येणार आहेत.या स्पर्धेमुळे शहरातील तरुणाई व कुटुंबीयांना नवरात्र उत्सवाचा आनंद दांडिया-गरबाच्या तालावर साजरा करण्याची संधी मिळणार आहे.जास्तीत जास्त जोडप्यांनी आपली नोंदणी करून स्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन डॉ.के.पी.गारोळे एज्युकेशन सेंटरच्या वतीने करण्यात आले आहे.



