डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेनुसार राष्ट्र निर्माण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे-ॲड एस. के. भंडारे

50

 

 

मुंबई – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांना व समाजाला झालेल्या विषमतेचे,चातुर्वर्णाचे बसलेले चटके त्यामुळे त्यांनी 23 सप्टेंबर 1917 रोजी केलेल्या संकल्पानुसार संविधानाच्या माध्यमातून धर्म, वंश, जात, जन्मस्थान, स्त्री, पुरुष , रूढी, परंपरा इत्यादीवरून कोणतीही विषमता न करता सर्वांना समानतेचे मूलभूत अधिकार देऊन आपल्या पूर्वजांच्या गळ्यातील मडके आणि पाठीचा खराटा कायमचे काढले आहेत परंतु ते सांकेतिक दृष्ट्या पुन्हा ते आणण्यासाठी समतेचे विरोधक पुन्हा प्रयत्न करीत आहेत, देशात जातीय तेढ निर्माण होत असून असहिष्णुता वाढत आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी लोकशाहीसाठी जे 12 धोके आणि इशारे दिले त्यातील एक महत्वाचा असा आहे की, डॉ बाबासाहेब म्हणतात देश म्हणजे जाती जातीने बनला आहे तो देश, मात्र आपणास राष्ट्र निर्माण करायचे आहे म्हणजे जाती अंत करावा , जनतेत राष्ट्र भावना निर्माण करण्यासाठी सरकारने करावे. व आपही कटिबद्ध व्हावे असे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड एस. के. भंडारे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्रांती प्रस्थापित कशी मागे घेऊन चालले आहेत याचे विवेचन करून ती आठ गोल्डन मार्गाने कशी गतिमान कशी करावी या बाबत ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या बौद्धांच्या मातृ संस्थेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाने दिनांक 23/9/2025 ते 2/10/2025 या कालावधीत देशातील विविध राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांची अखिल भारतीय इंटरान्स टेस्ट घेऊन मेरिट ने प्रथम पास झालेल्या विविध राज्यातील पदाधिकारी यांच्या केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिर (हिंदी), चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे मागदर्शन केले.

ॲड एस के भंडारे यांनी पुढे असे सांगितले की, बौद्ध ही समतेची विचारधारा आहे त्यामुळे जाती अंत करण्यासाठी संविधान समर्थक जो डो अभियान राबविले पाहिजे.त्यानंतर त्यांनी संस्थेचे कामकाज आणि लेखा पद्धती याविषयावरही मार्गदर्शन करताना पदाधिकारी यांनी समाजाच्या पैशाचा हिशोब पारदर्शक पने कसा द्यायचा याची सविस्तर माहिती दिली. यावेळी शिबिराचे मुख्य भिक्खु भंते विशुद्धानंद व व्यवस्थापक एम डी सरोदे गुरुजी (उपप्रमुख, केंद्रीय प्रशिक्षण विभाग), व सुनिल बनसोडे (सदस्य, केंद्रीय प्रशिक्षण विभाग व सचिव, मुंबई प्रदेश) तसेच बी. एम कांबळे (राष्ट्रीय सचिव) हे उपस्थित होते.