चोपडा महाविद्यालयात सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे पॉट पेटिंग स्पर्धेचे आयोजन

37

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे पदवी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पॉट पेंटिग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.के एन.ए.सोनवणे उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम.बागुल व समन्वयक डॉ.एस.ए.वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ.आर.एम.बागुल यांनी विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र विषयाचे महत्व पटवून दिले. तसेच उपस्थित मान्यवरानी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत एकूण 20 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर आधारीत पेंटिंग तयार केल्या. या स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ. जे. जी.पाटील तसेच डॉ. एच.जी.सदाफुले व डॉ.सौदागर यांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील शिक्षक वसीम पटेल, पूजा सोनवणे,जाहिद मणियार,माधुरी पाटील,स्वीटी निकम तसेच शिक्षकेतर कर्मचारी महेंद्र क्षीरसागर व यतीन पाटील यांचे सहकार्य लाभले.