मनमानी केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवार घेतला आक्षेप.

283

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)

गंगाखेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग राचनेवर आक्षेप घेण्यात आला आहे.निवडणूक आयोगाने काढलेले आदेश दिनांक 10/06/2025परिच्छेद क्रमांक 5.5अन्वये प्रभाग रचना करताना सर्व प्रथम उत्तर दिशेने सुरवात करावी व ईशान्य (उत्तर -पूर्व )त्या नंतर पूर्वे दिशेला येऊन पूर्वे कडुन पश्चिमेकडून प्रभाग रचना करत शेवट दक्षिणे करावा असे आदेशात नमूद केलेले आहे. परंतु नगर परिषद गंगाखेड यांनी राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशाचे उल्लंघन करून गंगाखेड नगर परिषद यांनी प्रभाग ची सर्व प्रार्थम रचना जाहीर करताना उत्तर दिशा हि स्मशानभूमी ते तरुमोहल्ला कब्रस्तान ते गोदावरी मार्ग ते रेल्वे पूल ते न. प. हद्द स. न. 09 पर्यंत दाखवण्यात अली आहे. परंतु प्रभाग क्रमांक 01 मुळातच उत्तर दिशा ठरवलेली आहे ती चुकीची असून भौगोलिक रचना पाहता उत्तर दिशा हि चिंतामणी मंदिर, जुनी पाण्याची टाकी या ठिकाणी उत्तर दिशा येते. या ठिकाणा हुन प्रभाग रचना सुरु करणे अवशक आहे, या पूर्वी सार्वजनिक निवडणुका मध्ये चिंतामणी मंदिरापासून म्हणजे उत्तर दिशेकडून प्रभाग रचना करण्यात अली होती. परंतु गंगाखेड नगर परिषद यांनी प्रारूप प्रभाग रचना ही उत्तर दिशा ही स्मशानभूमी,तरुमोहल्ला कब्रस्तान येथून अत्यन्त चुकीची दाखवण्यात अली असून, ही उत्तर दिशा चिकीची दाखवण्यात आल्या असल्या मुळे याचा परिणाम इतर सर्व प्रभागावर होणार आहे. ही प्रारूपरचना करताना, एखाद्या विशिष्ट गटाला फायदा होईल या दृष्टीने उत्तर दिशा ठरवून प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. गंगाखेड परिसराचा विचार केल्यास उत्तर दिशा ही चिंतामणी मंदिर व जुनी पकण्याची टाकी येथून प्रभाग रचना सुरु करून शेवट दक्षिणेश करावा आसा आक्षेप. माझी नगर सेवक, तथा सामाजिक कार्यकर्ते *गौतम रोहिणकर* यांनी मा. मुख्यधिकारी, नगर परिषद गंगाखेड यांच्या कडे दाखल केला आहे.