

▪️वडूज पोलीस प्रशासनाच्या अहवानाला प्रतिसाद
▪️सामाजीक सलोखा जपण्यासाठी मुस्लीम समाजाचा निर्णय
✒️सातारा,खटाव प्रतिनिधी(नितीन राजे)मो:-9822800812
सातारा(दि.3सप्टेंबर):- जिल्ह्यातील वडूजसह खटाव तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो . मुस्लीम धर्मियांचा महत्वाचा सण पैंगबर जयंती शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी येत आहे . पण त्या दरम्यान गणेश मंडळाच्या मिरवणूका असणार आहेत. त्यामुळे पोलीस निरिक्षक धनश्याम सोनवणे व पोलीस प्रशासनाच्या अहवाना नुसार पैगंबर जयंती शुक्रवार दि. ५ ऐवजी रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय मुल्ला मसजीद ट्रस्टच्या निवेदनाद्वारे मुस्लीम समाजाने केला आहे .
याबाबात माहिती अशी की , इस्लाम धर्माचे प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीला पंधराशे वर्ष पूर्ण होत आहेत . हा मुस्लीम समाजाचा महत्वाचा सण शुक्रवार दि.५ सप्टेंबरला आहे . पण त्या दिवशी वडूज शहरातून मोठ्या प्रमाणात गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणूका निघणार आहेत . त्यामुळे शहरात गर्दी ,वाहतुक कोंडी व संभाव्य गोंधळाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामाजीक सलोखा टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या आहवानाला प्रतिसाद देत वडूज मधील मुस्लीम समाजाने पुढाकार घेत मिरवणूक शुक्रवार दि. ५ ऐवजी रविवार दि. ७ रोजी घेण्याचे नियोजन केले आहे .
यावेळी मुस्लीम समाज बांधवानी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांना मिरवणुकी सदर्भात लेखी निवेदन दिले . या निवेदनात वडूज शहरातून सकाळी ९.३० ते ११.३० पर्यंत मिरवणूक व संध्याकाळी ७.३० ते ९ पर्यंत लहान मुलांच्या वकृत्व स्पर्धा आहेत .यावेळी निवेदन देताना मुल्ला मसजीद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला , कय्युम मुल्ला ,आमीन मुल्ला , दाऊदखान मुल्ला , मुन्ना मुल्ला ,असलम मुल्ला , रियाज मुल्ला , मनसुर मुल्ला , आयुब मुल्ला , जाफर आतार , आरोप मुल्ला , बंटी मुल्ला , रिहाल मुल्ला , सोहेल मुल्ला सद्दाम मुल्ला , नईम मुल्ला यासह मुस्लीम बांधवांची उपस्थिती होती . सर्व कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन मौलाना तोसीफ रजवी यांनी केले आहे .
पोलीस निरिक्षकांचे आवाहन .. वडूज मुस्लीम समाजाचा सकारात्मक प्रतिसाद ..
पोलीस निरिक्षक घनश्याम सोनवणे यांनी ईद-ए-मिलाद च्या बैठकीमध्ये आवाहन केल्यानंतर मुस्लीम समाजाने विसर्जन दिवशी मिरवणूक न काढता सामाजिक सौहार्दायाला प्राधान्य देत मिरवणूक रविवारी घेण्याचा निर्णय घेतला . त्यावेळी त्यांनी दोन्ही समाजातील लोकांनी शांतता व बंधुता जपत उत्सव पार पाडावेत असे ही आवाहन केले .



