

संजीव भांबोरे, विशेष प्रतिनिधी, मो.70663 70489
भंडारा -बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञान जो कोणी स्वीकारेल, जो कोणी अमलात आले जो कोणी आचरण करेल त्याचे जीवन सुखमय समाधानी आणि सुखी समृद्ध होईल. त्यामुळे बुद्ध आणि धम्म सर्वांनी वाचलं पाहिजे आचरण केले पाहिजे पंचशीलचे पालन केले पाहिजे. दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे आणि बुद्ध विहार दरवेळी उघडले पाहिजे. त्यामध्ये बुद्ध धम्माचे वाचन झालं पाहिजे हे जरअस झालं तर बुद्ध धम्माचे प्रचार प्रसार व धम्म वाढवणे होय, बुद्ध धम्मात वाईट व्यसनाला महत्त्व नाही असे मत भंते शीलभद्र बोधी यांनी व्यक्त केले.
ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथील वर्षावासानिमित्त उपासकांना मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले.
सकाळी साडेपाच तर सात वाजेपर्यंत मेडिटेशन व सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत बुद्ध धम्माच्या ग्रंथाचे वाचन असं तीन महिने उपक्रम सुरू आहे
याप्रसंगी तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे, उपाध्यक्ष अशोक रंगारी, सूर्योदया रंगारी , पुष्पा बडोले, सुलभा हुमणे ,सुलभा हुमणे, शालू नंदेश्वर, नंदा कोचे, संगीता मेश्राम, शितल नागदेवे, सविता राऊत, प्रतिमा राऊत, शशिकला सांगोलकर, नलिनी करमरकर गीता खंडारे, उत्तमाँ गडपायले, स्वर्णमाला गजभिये, सुनंदा कोटांगले, धन्वंत नंदेश्वर, शामल मेश्राम, विना शहारे, कोमल खोब्रागडे, अरविंद राऊत, किशोर राऊत, चंदन मेश्राम, सोनू राऊत, अशोक रंगारी, बी टी राऊत, डी जी रंगारी व इतरही बौद्ध उपासक प्रसंगी उपस्थित होते.



