

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, 9423608179
चिमूर- जुलै २०२५ पासून शिक्षक कर्मचायांचे रखडलेल्या महागाई भत्त्यासह व जुलै ते आक्टोबर महिण्याच्या थकबाकीसह आक्टोबर २०२५ चे वेतन दिवाळीपूर्वी १५ आक्टोबर २०२५ पर्यंत करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र मोहितकर यांनी केलेली आहे.
गेल्या चार महिण्यापासून महागाई भत्त्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतलेला नाही हा निर्णय तात्काळ घेवून दिवाळीपूर्वी थकबाकीसह वेतन द्यावे. दरवर्षी महागाई भत्ता हा जानेवारी व जुलै महिण्यात दिला जातो. नेहमी महागाई भत्ता उशीरा देण्याची पूर्वापार प्रथा परंपरा अजुनही सुरू आहे. कोरोना काळातील १८ महिण्यांचा महागाई भत्ता अजुनही देण्यात आलेला नाही.
शासन वेतन आयोग, महागाई भत्ता, थकित वेतन, मेडीकल बील, पेन्शन, ग्रॅच्युएटी उशीराच देण्याची परंपरा अजुनही सुरू आहे. कर्मचार्यांची देणी जर उशिरा दिली तर त्या अधिकाऱ्यावर व संबंधितावर व्याजाचा भुर्दंड बसतो व तसा शासनाचाच जी.आर.आहे. परंतू अजुनही त्यावर अमंबजावणी नाही.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात तरी तात्काळ निर्णय घेवून महागाई भत्त्यांच्या थकबाकीसह दिवाळीपूर्वी वेतन अदा करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे चंद्रपूर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र मोहितकर यांनी केलेली आहे.



