

संजीव भांबोरे, विशेष प्रतिनिधी, मो.70663 70489
भंडारा जिल्हा अध्यक्षांची महाराष्ट्र स्तरिय व्हिडिओ कॉन्फरन्स सभेतून माहिती
भंडारा-ओबीसी आरक्षणासाठी राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद व अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक “शिवा” संघटना येत्या ( मंगळ. ०७ ऑक्टों.) ला मुंबई आझाद मैदानावर ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पहील्या आंदोलनाचा शंखनाद करीत आहेत. याबाबत ओबीसी परिषद व शिवा संघटनेची ( ०१ सप्टें.) ला राज्य स्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे हे सहभागी झाले होते.
ओबीसींच्या न्याय हक्कासाठी मुंबई उच्च न्यायालयात “त्या” दिशाभूल करणा-या शासन निर्णयाविरोधात पहिली याचिका दाखल करणारी संघटना म्हणजे शिवा संघटना ही ठरली. आणि ओबीसींच्या आरक्षण रक्षणासाठी येत्या ७ ऑक्टोंबरला मुंबई आझाद मैदानावर पहिले आंदोलन छेडणारी संघटना सुद्धा “शिवा” संघटना आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन जो मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल फसवणूक करून जो ०२ सप्टेंबरला थोतांड जीआर काढला आहे तो रद्द करावा. नवी मुंबई विमानतळाला ओबीसी भूषण के.डी.वाय. पाटील यांचे नाव द्यावे. हैदराबाद सातारा व इतर गॅजेटीयर प्रमाणे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत आहात तर दुजा भाव न करता लिंगायत वीरशैव समाजासह गॅजेटीयर मध्ये उल्लेख आलेल्या सर्व जातींना ओबीसी व त्या त्या प्रवर्गात आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. या मागण्यांसाठी येत्या ०७ ऑक्टोंबरला मुंबई आझाद मैदानावर एकदिवसीय धरणे आंदोलनाला जास्तीत जास्त ओबीसींनी आपल्या न्याय हक्कासाठी आपण एकत्र येऊन मुंबई गाठावी असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद व शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, उपाध्यक्ष माजी आमदार शिवशरण अण्णा बिराजदार, सरचिटणीस उमाकांतआप्पा शेटे, रूपेश होनराव, धन्यकुमार शिवणकर, उपाध्यक्ष अभय कल्लावार, दत्ताप्पा खंकरे, वाय. बी. सोनटक्के, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मनिष पंधाडे, उपाध्यक्ष भिमाप्पा खांदे, सुनिल वाडकर, शैलेश जक्कापुरे यांनी केले आहे. तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्यातील समस्त ओबीसी समाज बांधव, वीरशैव लिंगायत, वीरशैव नाथजोगी, जैन वाणी, लिंगायत जंगम, वाणी समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने ०७ ऑक्टोंबरला मुंबईत येत या अभूतपूर्व व पहिल्या शंखनाद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत युवक “शिवा” संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी केले आहे.



