अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जप्त-महसूल विभागाची कार्यवाही

82

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

राजुरा(दि.9ऑक्टोबर):-अवैधरित्या रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या विना नंबर प्लेट असलेल्या दोन ट्रॅक्टर वर महसूल विभागा ने कारवाई केली आहे.एक करवाही दिनांक 08.10.2025 रोजी रात्री 1 वाजताच्या दरम्यान रामपूर मार्गेने राजुरा कडे येणाऱ्या एक ट्रॅक्टर वर करण्यात आली. आणि दुसरी करवाही दिनांक 08.10.2025 रोजी पहाटे 6 जावताच्या दरम्यान भवानी मंदिर नाल्या मधून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर वर करण्यात आली. 

                                         याप्रकरणी आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे हे ट्रॅक्टर कार्तिक खामणकर व देवानंद येवले यांचे असल्याचे सांगण्यात आलेले आहे. जप्त केलेला मुद्देमाल व ट्रॅक्टर तहसील कार्यालय, राजुरा येथे लावण्यात आलेले आहे. ही कारवाही तहसीलदार राजुरा याच्या मार्गदर्शनात तलाठी रामचंद्र बोधे, रामचंद्र खंदारे आणि घनश्याम शेटे यांनी कारवाई केली.