

चोपडा : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम -उषा सॉफ्ट कांपोनंट अंतर्गत एक दिवसीय Community Development Program for Tribal Students चे’ आयोजन करण्यात आलेले आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवि, जळगाव अधिसभा सदस्य प्रा. डॉ. कांचन महाजन यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक व अधिसभा सदस्य प्रा. डॉ. कांचन महाजन, प्रमुख मार्गदर्शक तसेच नंदुरबार ट्रायबल अकादमीचे संचालक प्रो. डॉ. किशोर पवार, चोपडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे, कार्यक्रमाचे समन्वयक व उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी,समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ, उपप्राचार्य पी. एस. पाडवी आदि उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक,उपप्राचार्य प्रो.डॉ. आर. एम. बागुल यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील एकूण 200 हून आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक प्रा. डॉ. कांचन महाजन उदघाटनपर मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, ‘आदिवासी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास साधून सामाजिक स्तर उंचवावा. नैसर्गिक साधनांचे संवर्धन करून स्थानिक रोजगार निर्मितीवर भर द्यावा. कमीत कमी संसाधनातून जीवन जगण्याची कला प्राप्त व्हायला हवी.’
यावेळी ट्रायबल अकादमी नंदुरबारचे संचालक प्रो. डॉ.किशोर पवार ‘आदिवासी विद्यार्थी सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘आदिवासी विद्यार्थ्यांनी स्वतःतील न्यूनगंड दूर करून मोठे स्वप्न बघावेत. शिक्षण प्रवाहात यायला हवे व स्वयंविकास साधावा. स्वतःच्या ज्ञान कक्षा रुंदावाव्यात’.
चोपडा येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत बारेला यांनी ‘आदिवासी विद्यार्थी उद्योजकता आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन म्हणाले की, ‘आदिवासी विद्यार्थ्यांचा जन्मापासून संघर्ष सुरू होतो.आदिवासी तरुण हा समाज, संस्कृती, बोली व कुटुंबाचा प्रतिनिधी असून आदिवासी तरुणांनी योग्य वेळेत ध्येय ठरवून मार्गक्रमण करावे. मनावर नियंत्रण ठेवून व्यसनापासून दूर राहावे. स्वतःला निडर व बेडर बनवावे.परिस्थितीला बदलण्याची हिंमत विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये निर्माण करावी’. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन.सोनवणे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या जगण्याचा स्तर उंचावला पाहिजे. आयुर्वेदिक वनस्पतींच्या उपायांचा वापर करून स्वयंरोजगाराकडे वळले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासायला हवा. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडून त्यांना शिक्षण प्रवाहात आणणे गरजेचे आहे’.
कार्यक्रमाचे उदघाटन व प्रथम सत्राचे सूत्रसंचालन डॉ. सौ.पी.एन. रावतोळे यांनी केले तर आभार डॉ. पी. एन. सौदागर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बोदवड महाविद्यालयातील प्रा.डॉ. अजय पाटील यांनी ‘आदिवासी विद्यार्थी जीवन कौशल्य’ या विषयावर मार्गदर्शन करताना ‘कौशल्य शिवाय विकास होत नाही.विकसित करण्यासाठी संस्कार, विचार, ज्ञानप्राप्ती यांची गरज असते. स्व- विकासात आत्मविश्वास महत्त्वाचा असून प्रत्येक कृतीच्या मागे ध्येय, उद्दिष्ट असावे. त्यासाठी वाचन, तर्क निष्ठता, अनुभव यांची गरज असून आजूबाजूच्या गोष्टींचे बारीक निरीक्षण करून त्यापासून प्रेरणा घ्यावी’.
तसेच धरणगाव येथील प्रा. डॉ.अरुण वळवी ‘आदिवासी विद्यार्थी सामाजिक आणि आर्थिक समस्या’ या विषयावर मार्गदर्शन करताना आदिवासी विद्यार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक समस्यांवर भाष्य केले.
या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. पी. एन. सौदागर यांनी केले तर आभार डॉ. जे. जी. पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख व सदस्य तसेच डॉ.जे.जी.पाटील, डॉ के. डी. गायकवाड, वसीम पटेल श्रीमती विशाखा देसले, रवींद्र पाटील,भरत भालेराव यांची सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.



