ग्रामस्वच्छतेतून महिलांनी केले राष्ट्रनायकांना अभिवादन : सार्वजनिक शारदा महिला मंडळाचा पुढाकार.

61

 

राजुरा (ता.प्र.) :– असत्यावर सत्याचा विजय दर्शविणारा विजयादशमी उत्सव, समता आणि मानवतावादी मुल्यांची शिकवण देणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन, राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती अशा ऐतिहासिक दिवसांच्या औचित्याने राजुरा तालुक्यातील मौजा धोपटाळा येथील गुरुदेव नगर वार्ड येथील सार्वजनिक शारदा महिला मंडळाने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला. मंडळाच्या कोषाध्यक्षा सुषमा प्रफुल्ल शेंडे यांच्या संकल्पनेतून महिलांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवून भगवान श्रीराम, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री यांसारख्या महामानवांना श्रमदानातून अभिवादन केले.
यावेळी हिंदू, मुस्लीम, ईसाई, बौद्ध अशा सर्व धर्मीय आणि मराठी, हिंदी, तेलुगू, बंगाली, अशा विविध भाषिक महिलांनी एकत्र येऊन शारदामातेस वंदना करून ग्रामस्वच्छतेचा शुभारंभ केला. स्वच्छता हीच सेवा – गंदगी जानलेवा है. हम सबका है यही सपना – स्वच्छ हो भारत अपना, सभी रोगोकी एक दवाई – घर मे रखो साफसफाई, गांधीजी का एकही सपना – स्वच्छ हो भारत अपना अशा उत्साहवर्धक घोषणा देत, गीत गात त्यांनी गावकऱ्यांत स्वच्छतेचे महत्त्व रुजविले. श्रमदानाबरोबरच स्वच्छतेविषयी जनजागृती करून स्वच्छ ग्रामाच्या संकल्पनेला बळकटी दिली. तसेच विविधतेत एकतेचा संदेश दिला. स्वच्छतेचा हा उपक्रम ग्रामस्थांच्या विशेष कौतुकास पात्र ठरला. अभियानाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मंदिराताई बार, उपाध्यक्ष मंगलाबाई कामतवार, सचिव संगिताताई पाटील, कोषाध्यक्ष सुषमाताई शेंडे, सदस्य विठाबाई बोढे, वैशालीताई टेकाम, ग्रा. प. सदस्य छायाताई वैद्य, ग्रा. प. सदस्य संगीताताई हिवराळे, ग्रा. प. सदस्य प्रणाली जुलमे, ग्रा. प. सदस्य अल्काताई जुलमे, सुनीताताई भोयर, रेखाताई लिंगे, वर्षाताई बाभळे, राजश्री तपासे, माधुरी सपाट, सविता भलमे, सुषमा सपाट, सिमा तेलतुंबडे, चारूताई पडवेकर, सुनंदाबाई जुलमे, पदमाताई तल्लारी, माधवीताई कुसमा, वनुजाताई ताला, शारदाताई येडलावार, वंदनाताई इटणकर, संगीताताई इटणकर, दिक्षा पोलदासरी, जैसुदा गोळशिला, दर्शनाताई निवलकर, इती दास, टेटरी यादव, दर्शना कमटम, जिन्नत शेख, डाली गडडम, शारदा बुटले, सरिता यादव यासह स्थानिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.