हरजीतसिंग संधु यांची राजुरा शहर काँग्रेस अध्यक्षपदी निवड

92

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

▪️जोमाने कामाला लागा : जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

राजुरा(दि.7ऑक्टोबर):-राजुरा शहरातील गोरगरीब जनता, युवकांमध्ये प्रत्यक्ष कार्यरत राहुन त्याच्या सुखदुःखात मदतीला धावून जाणारे सक्रिय काँग्रेस कार्यकर्ते माजी नगरसेवक हरजीतसिंग संधु यांची राजुरा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, राजुरा येथे झालेल्या शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

       या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष धोटे यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन अधिक बळकट करण्याचे आवाहन केले. काँग्रेस पक्ष हा सामान्य जनतेचा आवाज आहे. लोकांच्या न्यायहक्कांसाठी सातत्याने लढा देणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जोमाने काम करणे, हीच आपली खरी जबाबदारी आहे, असे धोटे म्हणाले.

        नवीन अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हरजीतसिंग संधु यांनी विश्वास व्यक्त केला की, शहरातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काँग्रेस पक्षाची जनाधार वाढविण्यासाठी मी पूर्ण शक्तीनिशी कार्य करणार आहे.

         या बैठकीस राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, माजी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष साईनाथ बतकमवार, महासचिव एजाज अहमद, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, माजी नगरसेवक गजानन भटारकर, आनंद दासरी, संतोष मेश्राम, संदेश करमनकर, अँड. चंद्रशेखर चांदेकर, पंढरीनाथ चन्ने, धनराज चिंचोलकर, उमेश गोरे, सय्यद साबिर, गोलू ठाकरे, निरंजन मंडल, दिपक फुले, संतोष सिंग, रविंद्र आत्राम, संदीप बंडे, कुंदन वेंकटीवार, फारूख शेख, प्रदीप नैताम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचा शेवट काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एकतेच्या घोषणा आणि उत्साहवर्धक वातावरणात झाला.