

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)
चिमूर(दि.7ऑक्टोबर):-सद्यास्थीतीत शेतकरी आसमानी व सुलतानी संकटात सापटला असुन शेतकऱ्याला न्यायाची गरज आहे. चिमूर वनपरिक्षेत्रा अंतर्गत मौजा कवडशी मानूसमारी, बोरगाव (तु.), केसलापुर, सोनेगाव बेगडे, शेडेगाव शेत शिवार परिसरात अनेक वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील होवुन न्यायाच्या अपेक्षेत आहे.
शेतकऱ्यांच्या पाळीवर जनावरांची हत्या करणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांचा (बैल, गाय, वकरी, म्हैस वगैरे) वाघाकडुन हत्या करण्यात आलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना तात्काळ भरीव मोबदला देण्यात यावा, जंगली डुक्कर, चित्तर या प्राण्यांकडून करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान भरपाई वनविभागाकडुन तात्काळ पंचनामे करुन 20000/- रु. एकरी आर्थीक मदत देण्यात यावी.
चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना सौर उर्जेवर चालणारे झटका मशीन पुर्ण अनुदान तत्वावर देण्यात यावा. चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी लगत जंगलाच्या सिमेवरील झाडे झुडपे व मोठे गवत तात्काळ नष्ठ करण्यात यावे, चिमूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या जंगलाच्या सिमेला जाळी फॅसींग करण्यात यावी. या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ पुर्ण करण्यात यावा या करीता माजी नगरसेवक उमेश हिंगे यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी चिमूर यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी गोमाजी नन्नावरे, राजू दडमल, विशाल धारणे, किशोर दडमल, अरविंद नन्नावरे, भास्कर पातूरकर, संदीप मुंढरे, हरीभाऊ नन्नावरे, सुमित्रा दडमल, अशोक साटोने, राहुल हिंगे, चरणदास गभने, माधव नन्नावरे, प्रमोद नन्नावरे, वैभव नन्नावरे, दीपक नन्नावरे, संजय बाळचन्ने, मित्रान मेश्राम, चिंतामण बंडे, यशवंत कोरडे, नितेश डफ व असंख्य शेतकरी उपस्थित होते.



