

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428
राजुरा(दि.7ऑक्टोबर):- ॲड यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा द्वारा संचालित ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात स्वर्गीय अध्यक्ष सुधीर यादवराव धोटे यांच्या व्दितीय स्मृतिदिनाचा कार्यक्रम दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या स्मृतिदिनी कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष तथा राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संजय धोटे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये साहेबांच्या सपत्नी अनुराधा सुधीर धोटे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता जोगी, संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश धोटे, संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक इर्शाद शेख, महाविद्यालयातील कर्मचारी वृंद यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या वर्षा पोडे यांनी केले. तसेच सूत्रसंचालन प्रा. गोविंद झाडे यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवर व सर्व विद्यार्थी-शिक्षकांनी दोन मिनिटे मौन पाळून स्व. सुधीर धोटे यांच्या आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी आपल्या मनोगतामधून सुधीर धोटे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांचा शांत व संयमी स्वभाव, सर्वांना आपलेसे करणारी वृत्ती आणि योग्य मार्गदर्शन करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व यांची आठवण काढताना संपूर्ण वातावरण गहिवरून गेले. त्यांच्या कार्याची, समाजासाठीच्या योगदानाची आणि सर्वांना जोडून ठेवणाऱ्या जीवनमूल्यांची आठवण करून देताना महाविद्यालय परिसर शोकाकुल झाला.



