सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा वकील राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

61

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489

▪️संविधान बचाव संघर्ष समिती व गोंडवाना कृती संघर्ष समितीची मागणी 

भंडारा(दि.8ऑक्टोबर):-सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकणारा वकील राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तात्काळ घटक करण्यात यावी. तसेच लोकप्रिय शांततावादी नेता सोनम गांगचुक यांची तात्काळ सुटका करण्यात यावी, याबाबतचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी सावनकुमार यांच्यामार्फत भारताचे महामहीम राष्ट्रपती यांना संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा त्याचप्रमाणे गोंडवाना कृती संघर्ष समिती भंडारा जिल्ह्याच्या वतीने पाठविण्यात आलेले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, 6ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू असताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर मनुवादी प्रवृत्तीचे वकील राकेश तिवारी यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला व सनातन धर्म का अपमान नही सयेगा हिंदुस्तान असे नारे दिले. 

ही घटना न्यायालयासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी शरनेची बाब आहे. धर्माच्या नावावर उन्माद माजविणारे हे लोक भाजप आरएसएसच्या पाठिंब्याने अतिशय मोकाट झाले आहेत .आता तर रस्त्यावरचा उस्माद थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर बूट फेकण्यापर्यंत पोहोचला आहे. अशा शक्तींना व विचारांना वेळीच रोखले पाहिजे आज देशात विचार तर्काने संयम यांची जागा धर्मांधता सत्तेचा महाजनी न्यायव्यवस्थेवर उघड उघड हल्ला आहे. असल्या प्रवृत्तीमुळे लोकशाहीच्या धोक्यात आली आहे. 

सरन्यायाधीश भूषण गवई हे बुद्धिस्ट समाजाचे असल्याने व सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर असल्याने मनू वाद्यांना सहन होत नाही. म्हणून जातीयतेचा द्वेष भावनेतून हा नियोजित कट आहे. या घटनेचा सर्वत्र निंदा करण्यात येत आहे.तसेच राकेश तिवारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तात्काळ अटक करण्यात यावी .तसेच लदाख चे लोकप्रिय समाजसेवक, पर्यावरणवादी ,शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे, सैनिकांना मदत करणारे, वैज्ञानिक, सोनम वांगचुक यांच्यावर देशद्रोहाचा खोटा आरोप लावून केंद्र सरकारने अटक केलेली आहे. याच सोनम वांगचुक ला पूर्वी केंद्र सरकारने सन्मानित केले .सोनम वांगचुक यांचे वडील सैन्यात इंटिलेशन ब्युरो चे डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले. अशा व्यक्तींवर कुठलाही पुरावा नसताना देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून तुरुंगात धामणे म्हणजे सरळ सरळ लोकशाहीची सत्या करणे आहे. 

तुझ्या भाजपा सरकारने आपल्या निवडणूक घोषणापत्रात लद्दाच्या जनतेला आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पूर्तता करा अशी मागणी करणाऱ्या सोनमा वांगचुक यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांच्यावर खोटा आरोप लावून तुरुंगात ढाकणे म्हणजे सरळ सरळ लोकशाही संपवून मनुवादी हुकूमशाही आनंद होय. लोकशाहीला धोक्यात आणणाऱ्या प्रवृत्तीच्या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी व सोनम गांगचूक यांच्यावरील लावलेले खोटे आरोप मागे घेऊन त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी त्याचप्रमाणे खोटे आरोप लावणाऱ्या पोलिसांवर तात्काळ निधमनाची कारवाई करण्यात यावी व त्यांना अटक करण्यात यावे. यावेळी निवेदन देताना मुख्य संयोजक सदानंद इलमे,चंद्रशेखर चंद्रशेखर जिल्हा कार्याध्यक्ष, भैय्याजी लांबट संयोजक ,रूपचंद रामटेके कोषाध्यक्ष, सुरेश खोब्रागडे सहसचिव ,अशोक उईके, सहसचिव बाळकृष्ण सार्वे ,हिवराज उके ,रोशन उरकुडे ,प्रभाकर वैरागडे ,राधेश्याम कावळे ,दीपक जनबंधू, रोशन जांभुळकर जिल्हाध्यक्ष ,गोपाल सेलोकर महासचिव, आसितबागडे सचिव, विजय भोवते सहसचिव, राजेश मडामे सहसचिव, अजबराव चिचामे ,प्राध्यापक राहुल डोंगरे ,गोवर्धन कुंभरे ,पत्रकार संजीव भांबोरे, गौरीशंकर पंचबुदे, स्नेहल रोडगे ,श्रीकृष्ण पडोळे ,प्रभा पेंदाम,अमृत बनसोड, अरुण लुटे, पंजाबराव कारेमोरे ,विनायक बोंद्रे ,रमेश दुर्वे, अश्विन गोस्वामी, आर्यन फुलबांधे, उमाकांत रामटेके, जागेश्वर शेडगे ,दुर्योधन अतकरी ,संजय मते, हंसराज वैद्य ,मोरेश्वर तिजारे, विक्रांत भालाधरे ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.