

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)मो:-7066370489
भंडारा(दि.8ऑक्टोबर):-तालुक्यातील वळद पुनर्वसन येथे 14 ऑक्टोंबर 2025 ला बौद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने दुपारी 12 वाजता समाज मंदिर लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या समाज मंदिराचे उद्घाटन भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, यांच्या हस्ते होईल, सह उद्घाटक म्हणून दीपक वानखेडे सामाजिक कार्यकर्ता उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संजीव भांबोरे ब्ल्यू स्टर्म टीव्ही न्यूज चॅनल महाराष्ट्र प्रमुख तथा दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक उपस्थित राहतील .प्रमुख अतिथी म्हणून सुभाष आजबले अध्यक्ष समाज सुधार सहकारी पत संस्था वाकेश्वर, पंचायत समिती सदस्या सीमाताई रामटेके ,पंचायत समिती सदस्या काजल चवळे, व असंख्य मान्यवर यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन बौद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत वंजारी ,उपाध्यक्ष शीलवंत खोब्रागडे ,सचिव कवडू बनसोड, सहसचिव अक्षय खोब्रागडे, नासिक खोब्रागडे, मिलिंद बनसोड ,राजकुमार वंजारी, विनोद बनसोड ,रंजना खोब्रागडे ,राईबाई हुमने, प्रवीण खोब्रागडे ,वसंत बनसोड ,त्याचप्रमाणे वळद /जामगाव पुनर्वसन येथील सर्व बौद्ध ,उपासक उपासिका यांनी केलेली आहे.



