

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515
गंगाखेड(दि.9ऑक्टोबर):-नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत कार्यक्रम आज दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी उपजिल्हा कार्यालय गंगाखेड येथे उपविभागीय अधिकारी शिवराज डापकर, तहसीलदार सौ. उषकिरण श्रगांरे, मुख्यधिकारी जयवंत सोनवणे यांच्या उपस्थित 13 प्रभागा मधून 26 सदस्या साठी आरक्षण सोडत पार पडली यात अनुसूचित जाती साठी चार जागा सोडण्यात आल्या यात दोन महिला साठी व दोन पुरुष यासाठी सोडण्यात आल्या असून ना. मा. प्र. साठी सात जागा सोडण्यात आल्या आहेत.
यात चार महिला व तीन पुरुष साठी तसेच सर्व साधारणमहिला साठी सात तर सर्व साधारण पुरुष यांच्या साठी आठ जागा सोडण्यात आल्याआहेत या वेळी गंगाखेड शहरातील नेते कार्यकर्ते, पत्रकार, उपस्थित होते आरक्षण सोडत खेळी मेळी वातवारणात पार पडली.



