

✒️भद्रावती(पुरोगामी न्यूज नेटवर्क)
भद्रावती(दि.9ऑक्टोबर):- भारतीय सर्व्वोच न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर न्यायालयात हल्ला करणाऱ्या राकेश किशोर चा निषेध करीत त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, द्वारा तहसीलदार, भद्रावती यांचे तर्फे मा. राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
दि. 6 ऑक्टोबर 25 रोजी सर्वोच्च न्यायालयात राकेश किशोर नावाच्या एका नीच जातीयवादी मानसिकतेच्या वकिलाने हल्ला केला. हा हल्ला भूषण गवई साहेबांवर नसून संपूर्ण न्यायव्यवस्थेवर आहे. या कृत्यामुळे जगात भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन झालेली आहे. हा गुन्हा अक्षम्य आहे.
शिष्टमंडळात नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, उपाध्यक्ष नेताजी वि. तू. बुरचुंडे, पिरिपा चंद्रपूर ज़िल्हाध्यक्ष हरिशभाई दुर्योधन, रिपाई महिला आघाडी चंद्रपूर ज़िल्हाध्यक्ष्या लिनता जुनघरे, रिपाई ता. अध्यक्ष संतोषभाई रामटेके, महिला आघाडी ता. अध्यक्षा नंदाबाई रामटेके, शेवंताबाई मेश्राम, छाया देवगडे, अरुण भोयर, वशिष्ठ महादेव लभाने, सुनील रामटेके, महेंद्र नायभरोस लाभाने इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



