भारतीताई गोरे यांच्या महिला संवाद मेळाव्यास महिलांची आलोट गर्दी

51

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : खटाव तालुक्यातील औंध या गावात महाराष्ट्र राज्य ग्रामविकास मंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या थोरल्या वहिनी साहेब तर युवा उधोजक लोकनायक मा. अंकुशभाऊ गोरे यांच्या पत्नी सौ. भारती ताई गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातील महिलांशी संवाद साधता यावा यासाठी औंध येथील यमाई मंगल कार्यालय येथे महिला सवांद मेळावा व हळदी कुंकू समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सन्मान मातृशक्तीचा सन्मान नारी शक्तीचा हे ब्रीद वाक्य घेऊन भारती ताई यांनी औंध जिल्हा परिषद गटातील महिलांना सन्मान देत त्यांना आकर्षक पूजेचे ताट भेट वस्तू दिली.
या कार्यक्रमांस प्रमुख उपस्थिती ही सन मराठी वाहिनी वर प्रसिद्ध असलेली कलाकार मोनिका राठी( इन्स्पेक्टर मंजू) या होत्या सोबतच श्री किशोर काळोखे सुपरचित सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रसिद्ध वक्ते तसेच लेखक निर्माते तेजपाल वाघ, औंध पोलीस स्टेशन चे पोलीस प्रभारी गणेश वाघमोडे साहेब होते.
यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांची भाषणे झाली. सुप्रसिद्ध वक्ते किशोर काळोखे यांचे काय तुजा मनात या विषयास महिलांचा उत्सफुर्त प्रतिसाद मिळाला.
भारतीताई गोरे यांनी बोलताना सांगितले कि मी औंध गटातील सर्व महिलांच्या पाठीमागे खंबीर पणे उभी राहणार आहे पण काही निष्क्रिय लोकांच्या बुद्धीची मला कीव येते.अंकुशभाऊ गोरे यांनी सुद्धा महिलांना संबोधन करताना सांगितले कि येणाऱ्या काळात 50 हजार महिलांची आरोग्य तपासणी होणार आहे.
आयोजकांनी महिलांना उपासाचे फराळाचे नियोजन केले होते. अंकुश भाऊ गोरे यांचे योग्य नियोजन आणि कार्यकर्ते यांचे परिश्रम यामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.