भारतीय बौध्द महासभा शाखा, माण तालुका आणि जयभीम युवक मंडळ यांचे संयुक्त विध्यमाने साजरा होणार धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

42

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*

 

म्हसवड : भारतीय बौद्ध महासभा शाखा, माण तालुका आणि जयभीम युवक मंडळ, म्हसवड यांचे संयुक्त विध्यमाने 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9=00 वाजतां डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,म्हसवड, ता. माण, जि. सातारा येथे 69 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणेत येणार असलेचे भारतीय बौध्द महासभा शाखा, माण तालुक्याचे अध्यक्ष आयु. अरविंद बनसोडे यांनी सांगितले.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ सर्वत्र साजरा केला जातो.
धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारल्याच्या दिवसाचे प्रतीक आहे.
त्यामुळे माण तालुक्यातील धम्म बांधव, उपासक, उपासिका, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील सर्वच बांधवानी यां कार्यक्रमास उपस्थित राहावे असे अरविंद बनसोडे यांनी आवाहन केले आहे.