

खामगांव : माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या खामगांव तालुका प्रचार प्रमुख पदी सुरजभैया यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुराजभैया यादव हे एकनिष्ठा रक्तदाता फाऊंडेशन चे संस्थापक
आहेत . त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
या निवडीची घोषणा माहिती अधिकार फेडरेशन महाराष्ट्र अध्यक्ष. सुभाष बसवेकर साहेब यांनी केली . तर बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लहाने. व चिखली तालुका अध्यक्ष दिनेश रावणकार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. सूरज भैया यांचे पद मानद स्वरूपाचे असून . त्यांना भारतीय संविधान . कायदे आणि
महासंघाच्या आचार संहितेचे काटेकोर पाने पालन करण्याचे आदेश दिले आहेत. सूरज भैया यादव यांनी माहिती अधिकार अधिनियम.2005 चां उपयोग व्यापक जनहितासाठी करावा . तसेच या कायद्याचा प्रसार व प्रचार सर्व सामान्य नागरिकांपर्यंत व समाजामध्ये प्रभावीपने करावा. अशी अपेक्षा
बसवेकर यांनी व्यक्त केली. सूरज भैया यांच्या नियुक्ती मुळे
माहिती अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणी ला गती मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.



