भीम आर्मी कडून धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोल माफीची मागणी

47

पुसद -धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे १ ते ४ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर अनुयायांना प्रवासादरम्यान भेडसावणारा आर्थिक व मानसिक भार लक्षात घेऊन राज्यातील महामार्गावरील टोल नाक्यांवर टोलमाफी करावी, अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन पुसद येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले. दरवर्षी देशभरातून लाखो भाविक नागपूर येथील दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतात. या काळात प्रवासादरम्यान टोल नाक्यांवरील शुल्कामुळे अनुयायांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो.
“राज्य शासनाने सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाच्या या सोहळ्यास सहकार्य करत टोलमाफीचा निर्णय घ्यावा, यामुळे अनुयायांना दिलासा मिळेल,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, आजाद समाज पार्टी युवा मोर्चा यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत, विठ्ठल जाधव होते.