क्रांतीज्योती व क्रांतीसुर्य शिक्षक प्रेरणा पुरस्कार सोहळा संपन्न

49

प्रतिनिधी – जगदीप वनशिव

नाशिक – येथील परशुराम सायखेडकर नाट्यमंदिर. शालिमार नाशिक येथे पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी नाशिक तर्फे क्रांतीज्योती व क्रांती सूर्य शिक्षक प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय किरणजी लोखंडे, संपादक दैनिक पुण्यनगरी , कार्यक्रमाचे अध्यक्ष नितीनजी ठाकरे, सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय वासुदेव देसले DYSP नाशिक ग्रामीण, माननीय प्राध्यापक डॉक्टर संदेश वाघ, इतिहास विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ,माननीय आशिष जयस्वाल,सत्य साई शिक्षण प्रसारक मंडळ सचिव छत्रपती संभाजीनगर, माननीय सोमनाथ भिसे, माजी उपसभापती सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर, माननीय सुषमाताई वासुदेव देसले, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर, माननीय रंगनाथ जाधव, सेवानिवृत्त शिक्षक, शिवूर व संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक माननीय प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे संचालक आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी व अध्यक्ष पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, माननीय योगेश रंगनाथ जाधव स्टार्टअप मेंटॉर
कार्यक्रमाचे स्वागत्तुक माननीय शरद धनराव महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध पत्रकार रानकवी जगदीप वनशिव हे उपस्थित होते
महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या १०५ शिक्षकांचा क्रांतीज्योती व क्रांतीसुर्य शिक्षक प्रेरणा पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील निवडक संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था या संस्थेचा दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून माझी संस्था या विशेष अंकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व एअर रँकर लर्निंग ॲप या ऑनलाइन स्टार्ट अप कंपनीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय किरणजी लोखंडे यांनी आहिरे अकॅडमी व पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व प्राध्यापक डॉक्टर आनंद अहिरे यांचे कौतुक केले . तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नितीनजी ठाकरे सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांनी शिक्षक हा किती महत्त्वाचा आहे व त्यांना प्रेरणा देणारी ही संस्था यांचे अभिनंदन केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय वासुदेव देसले DYSP नाशिक ग्रामीण यांनी असे सांगितले की पुरस्कार हा प्रेरणा , उत्साह वाढवितो हे प्रेरणा व उत्साह वाढविण्याचे काम प्रत्येक वेळेस पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत डॉक्टर प्राध्यापक आनंद अहिरे सर नेहमीच करत असतात कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक डॉ प्रा आनंद आहिरे यांनी असे सांगितले की प्रत्येक शिक्षक हा आदर्शच असतो पण क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन ज्या शिक्षकांनी डोंगरदऱ्यापासून खेडोपाड्यापर्यंत व विविध ठिकाणी शिक्षण क्षेत्राबरोबरच विद्यार्थी घडविण्याचे काम केलेले आहे अशा 105 शिक्षकांना या पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे निवडून क्रांतीसुर्य व क्रांतीज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय सौ सोनाली आनंद आहिरे , सचिव पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सुनील बैसाणे,अनिता धबाले, आहिरे अकॅडमी चे विद्यार्थी , रमाबाई वस्तीगृह यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आहिरे यांनी केले.