इनरव्हिल क्लब अंबाजोगाई कडून शिक्षकांना नेशन‎ बिल्डर अवॉर्ड देत कर्तृत्वाचा सन्मान‎

81

अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) : राष्ट्र घडणीत महत्वाचे योगदान देणा-या शिक्षकांप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासह चांगले काम करणा-या शिक्षकांना प्रोत्साहीत करण्याच्या भावनेतून येथील इनरव्हिल क्लब तर्फे ६ शिक्षकांना नेशन‎ बिल्डर अवॉर्ड प्रदान करण्यात आला. येथील रोटरी क्लबच्या हॉल मध्ये दि. १ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला.
ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण, इनरव्हिल क्लब अध्यक्षा संगीता नावंदर, सचीव कल्पना शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेशन‎ बिल्डर अवॉर्ड देवून शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कारार्थी शिक्षक असे – सुरेश मंत्री ( विश्वरूपी मा. विद्यालय, देवळा ), जयश्री मुंडे ( जि.प.प्रा. शा, चोंडी ), कटके प्रमिला ( जि.प.प्रा. शा, हनुमंतवाडी ), वंदना गायसमुद्रे (जि.प.मा. शा, राडी ), कल्पना नांदवटे ( मुकुंदराज विद्यालय, अंबाजोगाई ), सिमा केकाण ( वसंतराव विद्यालय, वरवटी ) या शिक्षकांना फेटा, शाल, गौरव पत्र फ्रेम व रोपटे देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुमताज पठाण यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल या शिक्षकांचे कौतुक केले. इनरव्हिल क्लबने ग्रामिण भागात काम करणा-या शिक्षकांच्या कार्याची दखल घेतली, त्यांना नेशन बिल्डर अवार्ड ने सन्मानित होताना पाहून आनंद होतोय, असं म्हणत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पुरस्कारार्थींनी सत्काराला उत्तर देत आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन सुनिता कात्रेला, रेखा तळणीकर यांनी केले. यावेळी जयश्री लव्हारे, सुरेखा कचरे, चंद्रकला देशमुख, वर्षा देशमुख, रेखा शितोळे, वर्षा जळकोटे, सुरेखा शिरसाठ यासह क्लबच्या सर्व सदस्या, मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.