विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा प्रा. कैलास गिरी

95

*प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)*

गंगाखेड येथील कै सौ शेषाबाई सीताराम मुंढे महाविद्यालयात ‘अध्यायन-अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाची भूमिका ‘ या विषयावर इंग्रजी विभागाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या विषयावर बोलताना प्रमुख व्याख्याते प्रा कैलास गिरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. या युगात विद्यार्थ्यांना खूप आव्हाने आहेत. मोबाईलचे मायाजाळ अध्यायन अध्यापणावर परिणाम करत आहे. विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर हा विकासाठी करावा. असे मत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भिंतीपत्रकाचे आणावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा अशोक केंद्रे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा डॉ राजीव आहेरकर यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजन व यशाबद्दल प्राचार्य डॉ बालाजी ढाकणे यांनी इंग्रजी विभागाचे व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.