डीजे चा खर्च टाळून दिले सार्वजनिक ठिकाणांना तार कुंपण-नवक्रांती दुर्गा मंडळ मांडवाचा स्तुत्य उपक्रम

181

 

 

 

बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी, पुसद (यवतमाळ), मो.78751 57855

पुसद- तालुक्यातील मांडवा येथे सर्व सुविधा पूर्ण स्मशानभूमी, गावात विविध चौक लोकसहभागातून करून एक आदर्श निर्माण केला . यातच एक भर म्हणून नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळानी महिलांना एक रंगाच्या साड्या,तरुण मुलांना टी-शर्ट, डीजे, इत्यादी गोष्टीवर होणारा खर्च टाळून सार्वजनिक ठिकाणाला दिले तार कुंपण

गावात दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यामध्ये जिजाऊ दुर्गा मंडळ, नवक्रांती दुर्गा मंडळ, वसंत दुर्गा मंडळ, जय लहुजी दुर्गा मंडळ या चार सार्वजनिक मंडळानी घटस्थापना केली होती.

नवरात्रोत्सवात नऊ दिवस दुर्गा देवीची आराधना केल्यानंतर विसर्जनाच्या वेळी महिलांना एक रंगाच्या साड्या, तरुण मंडळींना टी-शर्ट, डीजे, पारंपारिक वाद्य,इत्यादी गोष्टीच्या माध्यमातून दुर्गा देवी विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळानी इत्यादी गोष्टीवर होणारा खर्च टाळून श्री समर्थ नागोजी महाराज मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय मांडवा, अंगणवाडी क्रमांक २, हनुमान मंदिर समोरील प्रांगणासाठी दोन लाख रुपयाचे प्रवेशद्वारासहित तार कुंपण देऊन एक आदर्श निर्माण केला. या स्तुत्यपूर्ण उपक्रमाबद्दल नवक्रांती दुर्गा उत्सव मंडळावर संपूर्ण गावाबरोबरच तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.