

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(सातारा)(दि.8ऑक्टोबर):- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा माण तालुका यांच्यावतीने तसेच नालंदा बुद्ध विहार बौद्ध प्रगती मंडळ यांच्या समन्वयाने मौजे काळचौंडी येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा यादरम्यान सुरू असणाऱ्या वर्षावास प्रवचन मालिकेचा सांगता सोहळा उत्साहात संपन्न झाला.
भारतीय बौद्ध महासभा माण तालुका अध्यक्ष आयु. अरविंद बनसोडे, कोषाध्यक्ष आयु बाळासाहेब सरतापे ,सचिव आयु.श्रीमंत भोसले,ज्येष्ठ बौद्धाचार्य आयु.कुमार सरतापे, आयु. सचिन सरतापे आयु.आबासाहेब बनसोडे,माजी तालुकाध्यक्ष आयु.सिद्धार्थ बनसोडे, केंद्रीय शिक्षिका आयुनी.शोभा बनसोडे यांच्या मार्गदर्शनाने वर्षावास कार्यक्रम मालिका उत्तरोत्तर बौद्ध तत्वज्ञानाच्या अभ्यासाने दिशादर्शक ठरली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस धम्म ध्वजाचे अनावरण मा.आयुष्यमान बाळासाहेब माने साहेब मौजे काळचौंडी गावचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व तसेच निळ्या ध्वजाचे अनावरण सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक एक आदर्श व्यक्तिमत्व आयुष्यमान शिवाजी शिंगाडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातिला भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांना अभिवादन करून त्रिसरण व पंचशील, बुद्ध वंदना ज्येष्ठ बौद्धाचार्य कुमार सरतापे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा सातारा पूर्वचे जिल्हा संघटक ज्येष्ठ बौद्धाचार्य आयु. कुमार सरतापे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून काळचौंडी गावच्या प्रथम नागरिक सरपंच मा. अर्चना जाधव मॅडम माजी सरपंच मा.विजया माने मॅडम मा. बाळासाहेब माने साहेब सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्व तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रसाद माने विखळे गावचे सरपंच आयुष्यमान खैरमोडे साहेब आयुष्यमान पोपट बनसोडे सर चेअरमन वरकुटे मलवडी , आयु.अशोक बनसोडे सर व प्रमुख वक्ते म्हणून ॲड. बाळासाहेब सावंत, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आयु. शिवाजी शिंगाडे सर, दै. लोकमतचे जेष्ठ पत्रकार आयु.सिद्धार्थ सरतापे सर, ज्येष्ठ पत्रकार आयु. सचिन सरतापे सर,काळचौंडी विद्यालयाचे मुख्याध्यापक आयुष्यमान जाधव सर, आदर्श शिक्षक आयुष्यमान वाघमारे सर आयु. जयवंत नलवडे सर आयु. बौद्धाचार्य सुखदेव बनसोडे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आयु. अशोक बनसोडे आयुनी. शोभा बनसोडे मॅडम केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा, पत्रकार आयुनी. सुषमा सरतापे मॅडम इत्यादी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत सदस्य आयु. चेतन बनसोडे आयु.पिंटू बनसोडे आयु.निखिल बनसोडे आयु.अजित बनसोडे इत्यादी धम्म बांधव उपस्थित होते.
वर्षावास प्रवचन मालिका सांगता सोहळा कार्यक्रमाचे मुख्य वक्ते आयु. शिवाजी शिंगाडे सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी असणारे योगदान या विषयावर आपले प्रेरणादायी विचार मांडले. “शिका संघटित व्हा संघर्ष करा” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला दिलेला अनमोल विचार आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीत मानव मुक्तीचा लढा उभारला. कामगार कायदे,कामगार संघटना तसेच रिझर्व बँकेच्या स्थापनेमध्ये बाबासाहेबांचे योगदान खूपच मोलाचे आहे असे प्रतिपादन केले.
महिलांना समानतेचा ,मतदानाचा हक्क ,भूमिहीन व शेतकरी वर्गाला अनेक योजनांसाठी शिफारशी करण्याचे काम डॉ. बाबासाहेब यांनी केले. संविधान निर्मिती मधील बाबासाहेबांचे योगदान खूप महत्त्वपूर्ण आहे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. मतदान देण्याचा अधिकार घटनेच्या माध्यमातून दिला. प्रत्येक 21 वर्षे वयाच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळवून दिला बाबासाहेब हे उच्च विद्या विभूषित व्यक्तिमत्व होते त्यांनी अनेक विषयांचा सखोल अभ्यास केला होता.
बाबासाहेबांचा शैक्षणिक प्रवास हा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मी मानतो म्हणूनच मी माझे शिक्षण आज देखील सुरू ठेवले असून विविध विषयांमध्ये उच्चशिक्षित होत आहे. असे मत शिंगाडे सरांनी मांडले .बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग या देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत केला बाबासाहेबांनी त्यांच्या स्वप्नातील भारत संविधानाच्या माध्यमातून घडवलेला आहेफक्त संविधानाची योग्य अंमलबजावणी होऊन ती कार्यान्वित होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिंगाडे सरांनी केले.
काळभैरव विद्यालयाचे आदर्श शिक्षक आयुष्यमान वाघमारे सर यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म यावर विचार मांडताना मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या पंचशील तसेच दसपारमिता,आर्य अष्टांगिक मार्ग यांच्या पालनाने मानवाचा नैतिक विकास होणार आहे .हे अधोरेखित केले. येणाऱ्या काळात जगाला बुद्धांच्या तत्त्वांची नितांत आवश्यकता भासणार आहे. असे सूचक विचार मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती या विषयावर जेष्ठ पत्रकार आयु. सिद्धार्थ सरतापे सर यांनी विचार मांडताना जातीयता , उच्चनीचता,भेदभाव या कारणाने समाजाला ज्ञान न मिळाल्याने समाजाची प्रगती होणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारून आमचे कल्याण केले आहे असे विचार मांडले. शिक्षणाच्या प्रमुख चार पायऱ्यातून मनुष्याचा विकास घडत असतो शिक्षित ,सुशिक्षित, सुसंस्कृत व सृजनशील अशा त्या चार पायऱ्या होत यातील कोणत्या पायरीवर आपण उभे आहोत यावर चिंतन करणे गरजेचे आहे. 1935 मध्ये बाबासाहेबांनी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली व तब्बल 21 वर्षानंतर म्हणजे 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. अनेक धर्माचा अभ्यास करून सरते शेवटी मानवतेचा उच्चतम विकास करणारा शांतता व अहिंसेची शिकवण देणारा बौद्ध धम्म स्वीकारून संपूर्ण देशाचे कल्याण केले असे प्रतिपादन केले .
ॲड. आयु.बाळासाहेब सावंत यांनी तत्कालीन सामाजिक,शैक्षणिक ,आर्थिक तसेच राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना बेरोजगारी,येऊ घातलेली आर्थिक आणीबाणी,शासनाची धोरणे व अंमलबजावणी यातील विरोधाभास यावर अभ्यासपूर्ण मते मांडली. योग्य उमेदवार निवडणे हा आपला मूलभूत अधिकार असून देखील मतदारांवर प्रस्थापित पक्षाचे प्रतिनिधी उमेदवार म्हणून लादले जातात. अल्पसंख्यांक,एससी,एसटी समूहाच्या हक्क व अधिकारास संकुचित केले जात आहे.यातून देशाला वाचवण्यासाठी सुसंस्कृत असा बुद्धांचा सांस्कृतिक वारसा जपणे आवश्यक आहे तसेच राजकीय साक्षरता सुदृढ करणे आवश्यक आहे . असे कायदेविषयक मौलिक विचार मांडले.
काळभैरव विद्यालयाचे मुख्याध्यापक आयु. जाधव सरांनी भारतीय राज्यघटना निर्मितीमधील बाबासाहेबांचे योगदान विषद केले. सामाजिक धार्मिक तेढ निर्माण होणार नाही .याकडे सर्वांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मानवता एकमेव धर्म आहे. म्हणून जगाला बुद्ध तत्वज्ञान व त्यांच्या धम्माच्या शिकवणीची आवश्यकता आहे. असे कथन केले.
आयु. बौद्धाचार्य सुखदेव बनसोडे आयु. जयवंत नलवडे सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व बुद्ध तत्वज्ञान यावर आपले विचार मांडले.
बौद्ध प्रगती मंडळ मुंबई मंडळाचे अध्यक्ष आयुष्यमान अशोक बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर , भगवान गौतम बुद्ध तसेच सर्व महापुरुषांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे संच भेट म्हणून देण्यात आले. आयु. संतोष बनसोडे यांचे कडून भारतीय संविधानाचे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. आयु.संतोष बनसोडे आपल्या मनोगतात म्हणाले की, गुरु शिष्याचे नाते असेच अबाधित ठेवून सदैव शिकण्यास तत्पर राहणे गरजेचे आहे. सामाजिक ऐक्य,सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यास नेहमी सतर्क राहील पाहिजे.
सरते शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य कुमार सरतापे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजाला महापुरुषांचे विचार आत्मसात करून सामाजिक सलोखा जपण्याचे आव्हान केले. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून श्रामणेर,बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका निर्मितीसाठी धम्म बांधवांनी प्रयत्नशील राहावे असे सुचित केले.
वर्षावास मालिका सांगता सोहळा यशस्वी होण्या साठी भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी माण तालुका तसेच बौद्ध प्रगती मंडळ काळचौंडी चे अध्यक्ष आयु. सूर्यकांत बनसोडे, सल्लागार आयु. जगन्नाथ बनसोडे ,खजिनदार आयु. रवींद्र भोरे ,आयु.राजेंद्र बनसोडे,अतुल बनसोडे, आयु. गौतम बनसोडे ,राजाराम बनसोडे ,आयु.संतोष बनसोडे , अशोक बनसोडे,लक्ष्मण बनसोडे ,.मधुकर हावळे ,शिवाजी भोरे,महेश बनसोडे,आयुनी. ताराबाई बनसोडे रुक्मिणी बनसोडे ,सुवर्णा बनसोडे, पौर्णिमा बनसोडे, पोर्णिमा भोरे, जयश्री बनसोडे ,अरुणा बनसोडे ,नंदा बनसोडे ,सुनंदा बनसोडे ,वर्षा बनसोडे, कमल भोरे तसेच सर्व उपासक आणि उपासिका यांचे मोलाचे योगदान लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे माण तालुका कोषाध्यक्ष आयु. बाळासाहेब सरतापे सर यांनी केले. सूत्रसंचालन आयु.सिद्धार्थ बनसोडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक आयु. जाधव सर यांनी केले.
कार्यक्रमाचे शेवटी सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. बौद्ध प्रगती मंडळ काळचौंडी यांच्यावतीने मिष्ठान्नाचे भोजनदान देण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन करण्यात आले



