…अन्यथा १३ ऑक्टोंबरला नवेगाव बफर गेट बंद आंदोलन करणार-गावकऱ्यांचा इशारा

72

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.8ऑक्टोबर):-तालुक्यातील बरडघाट, पांढरपौनी, झरी येथील नागरीक मागील अनेक वर्षांपासून वनविभाग बफर झोन यांच्याकडे विविध समस्यावर वारंवार निवेदनाद्वारे लक्ष वेधत असतात मात्र याकडे वनविभाग बफर झोन कानाडोळा करीत असून, बरडघाट, पांढरपौनी, झरी येथील गावकऱ्यांच्या गावहिताच्या मागणीसाठी वन विभाग बफर झोन कोणतेही ठोस कार्यवाही केली जात नाही. असा आरोप खडसंगी येथील माजी उपसरपंच तथा भाजपा बूथ अध्यक्ष प्रमोद श्रीरामे यांनी केला आहे.

गावाकऱ्यांच्या मागण्या येत्या आठ दिवसात पूर्ण केले नाहीत तर १३ ऑक्टोबरला निसर्ग पर्यटन नवेगाव बफर झोन गेट बंद आंदोलन करण्यात येईल. असा इशारा खडसंगी येथील बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांना दिलेल्या निवेदनातून इशारा देण्यात आला आहे.

बरडघाट, पांढरपौनी, झरी येथील गावकरी मागील अनेक वर्षापासून निवेदन देऊन तिन्ही गावे बफर झोनमध्ये समाविष्ट करावे, जंगला लगत असलेल्या शेतसीमेवर जाळीचे कुंपण करून देण्यात यावे, जंगला लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या पडीत जमिनीला प्रती वर्ष एकरी ५० हजार रुपये प्रमाणे भाडे तत्वावर घेण्यात यावे, हिंस्त्र प्राणी गावात व शेतशिवारात येत असल्यामुळं वन्य प्राण्यांचे बंदोबस्त करण्यात यावे, बरडघाट, पांढरपौनी, झरी येथील सुशिक्षित बेरोजगारांना जिप्सी मार्गदर्शक म्हणून रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच नविन जिप्सी नोंदणीकरिता परवानगी देण्यात यावे, गावे विकास करण्यासाठी इको विकास समिती स्थापन करण्यात यावी, वरील तिन्ही गावातील गावकऱ्यांना चराई पास देण्यात यावी, तिन्ही गावातील गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना व मनुष्य हानी झाल्यास नुकसान भरपाई बफर झोन मार्फत देण्यात यावे.

त्यामुळे या मागण्या आठ दिवसात पूर्ण होईपर्यंत तिन्ही गावातील गावकऱ्यांच्या मार्फत शांततामय मार्गाने नवेगाव बफर झोन येथील निसर्ग पर्यटन गेट बंद आंदोलन येत्या १३ ऑक्टोबरला करणार आहोत. सदर आंदोलन कोणत्याही प्रकारे हिंसक नसेल व कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ तसेच मागण्या पूर्ण न केल्यास संपूर्ण गावकरी पर्यटन गेट बंद करो असे आंदोलन उभारण्यात येईल. तसेच गेट हटविण्याची कार्यवाही गावकऱ्यांनी केली तर याला सर्वस्वी जबाबदार वन विभाग प्रशासन राहतील. त्यामुळ सदर निवेदन गांभीर्यने लक्ष देऊन तात्काळ उचित कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन गावकऱ्यामार्फत देण्यात आले.

सदर निवेदन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, उपवनसंरक्षक प्रादेशिक, उपसंचालक बफर झोन ताडोबा, आदींना प्रतिलिपी देण्यात आले. यावेळी ५६ गावकऱ्यांच्या सहिनिशी निवेदन दिले. निवेदन देताना भाजपा खडसंगी मंडळचे अध्यक्ष तथा साताराचे सरपंच गजानन गुळधे, खडसंगीचे उपसरपंच संदीप भोस्कर, भाजपाचे अरुण लोहकरे, तालुका युवा भाजपा महामंत्री रोशन बनसोड, भाजपा बूथ अध्यक्ष प्रमोद श्रीरामे, आदित्य वासनिक, सचिन मेश्राम, मनी रॉय, रवी कोलते, प्रकाश रामटेके, मनोहर सहारे, निरंजना मेश्राम, वैशाली दोडके, प्रिया मेश्राम, दिपक भोयर, राहुल दोडके, सोनाली मेश्राम, यासह शेकडो गावकरी उपस्थित होते.