

✒️सातारा खटाव,प्रतिनिधी(नितीन राजे(मो:-9822800812)
खटाव(दि.9ऑक्टोबर):-भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधिश मा. भूषण गवई साहेब यांच्यावर झालेला हल्याचा जाहीर करत हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली
वडूज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी मा. गणेश भोसले, गौतमी ताई मसणे, शैलेंद्र वाघमारे, अॅड शुभम नलवडे, भगवान मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील संविधान प्रेमी नागरिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी पत्राद्वारे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड आणि अत्यंत निंदनीय हल्ल्याचा तीव्र निषेध करत,
न्यायव्यवस्था हा आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. न्याव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीवर झालेला हा हल्ला केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो देशाच्या संपूर्ण न्यायव्यवस्थेवरील आणि संविधानवर थेट हल्ला आहे. अशा घटना लोकशाही मूल्यांना धोका पोहोचवतात आणि समाजात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करतात.
त्यामुळे या भ्याड हल्ल्याची कसून चौकशी करून गुन्हेगाराला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी खटाव तालुका नेते मार्केट कमिटी संचालक शैलेंद्र वाघमारे, गणेश यादव, रामचंद्र निकाळजे, सुनील मिसाळ, जयपाल डावरे, जितेंद्र डावरे, मनोहर नलवडे, विठ्ठल नलवडे, युवराज रणदिवे, तुकाराम बनसोडे, संभाजी बनसोडे, सूर्यकांत बनसोडे, मारुती चव्हाण, सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



